इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज
भारताचा सिंगापूरवर
८३ धावांनी विजय
कोलंबो, ०३ ऑक्टोबर, (क्री.
प्र.) : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने
सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या सहकार्याने इनडोअर
क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा,
कोलंबो, श्रीलंका येथे सुरु आहे. हि स्पर्धा
मनीष किशोर यांच्या यु प्रो. या कंपनीने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशनच्या चार कोर्टचे
नुतनीकरण करत एकत्रीत आयोजित केली आहे. या स्पर्धेत चाळीस वर्षांवरील पुरुष गटात भारताने
दुबळ्या सिंगापूरचा १०४-२१ असा ८३ धावांनी
धुव्वा उडवला.
इनडोअर क्रिकेटच्या
मास्टर्स वर्ल्ड सिरीज मध्ये भारताचा चाळीस वर्षांवरील पुरुष संघ मजबूत समजला जात होता.
मात्र गेल्या दोन दिवसात या संघाला ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेकडून पराभव पत्करावा
लागल्यामुळे भारत ६ व्या क्रमांकावर फेकला गेला. आज भातीय संघाने जोरदार कामगिरीचे
प्रदर्शन करत सिंगापूरवर ८३ धावांनी विजय मिळवत पुन्हा एकदा क्रमवारीत वरचे स्थान मिळवण्यासाठी
प्रयत्नशील आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, युएई, द. आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका,
भारत, इंग्लंड व सिंगापूर एक ते आठ क्रमांकावर आहेत.
आज भारतीय संघाने
सिंगापूरवर विजय मिळवताना प्रथम फलंदाजी करताना पहिल्या स्कीन मध्ये (चार षटके)
भारताचा कर्णधार प्रसन्ना कुमार (१२ धावा व ३ विकेट) व अभिषेक वेस्ली (९ धावा)
यांनी २१ धावा धावफलकावर लावल्या. दुसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) कार्तिकेयन
सुब्रमानियन (उपकर्णधार) (२२ धावा व ३ विकेट) व शम्सीर चिंताविदा (२३ धावा व ३
विकेट) यांनी ४५ धावा चोपून काढल्या व भारताचा मजबूत केले. तिसऱ्या स्कीन मध्ये
(चार षटके) राजीव चंद्रसेकर (२३ धावा १ विकेट) व हिरेन प्रजापती (१३ धावा) यांनी
३१ धावांचे योगदान दिले. तर शेवटच्या स्कीन मध्ये (चार षटके) सुरज अग्रवाल (०६ धावा
व ४ विकेट) व समीर शाह (१ धाव व २ विकेट) यांनी ७ धावा केल्या व भारताने एकूण १०४
धावा करून एका मजबूत स्थिती निर्माण केली.
पराभूत सिंगापूरने पहिल्या स्कीन मध्ये (चार षटके) सिंगापूरचा कर्णधार अश्विन रवीन्द्रन (२ धावा ३ विकेट) व अभिनव चिंतामणी (वजा ३ धावा) यांनी वजा १ धाव केली. तर दुसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) विराज स्वरूप (१० धावा) व उपकर्णधार टोनी चीशोल्म (१२ धावा) यांनी २२ धावांची भर घातली. तिसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) इस्मेथ शाजहान (१२ धावा, ३ विकेट) व महालिंगम गोपालसामी (३ धावा, १ विकेट) यांनी १५ धावा केल्या तर शेवटच्या स्कीन मध्ये (चार षटके) विजय वैठीनाथान (वजा ८ धावा, १ विकेट) व अंकुश वर्मा (वजा ७ धावा) यांनी वजा १५ केल्याने भारताला सिंगापूरवर ८३ धावांनी मोठा विजय मिळवता आला.



Post a Comment
0 Comments