Type Here to Get Search Results !

इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ४० वर्षावरील गटात भारताचा इंग्लंडवर १ धावेने थरारक विजय

 



इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज

४० वर्षावरील गटात भारताचा इंग्लंडवर १ धावेने थरारक विजय

४५ वर्षावरील पुरुष गटात व ३० वर्षावरील महिला गटात

भारताचा श्रीलंकेकडून पराभव

 

कोलंबो, ०४ ऑक्टोबर, (क्री. प्र.) : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या सहकार्याने इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे सुरु आहे. हि स्पर्धा मनीष किशोर यांच्या यु प्रो. या कंपनीने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशनच्या चार कोर्टचे नुतनीकरण करत एकत्रीत आयोजित केली आहे. या स्पर्धेत चाळीस वर्षांवरील पुरुष गटात भारताने इंग्लंडवर ५५-५४ असा १ धावेने थरारक विजय साजरा केला. तर ४५ वर्षावरील पुरुष गटात व ३० वर्षावरील महिला गटात भारताचा श्रीलंकेकडून पराभव झाला. भारतीय महिलांचा जरी पराभव झाला असला तरी एकूण गुणांच्या जोरावर 5 ऑक्टोबर रोजी भारत विरुध्द श्रीलंका यांच्यात प्लेट फायनल होणाराहे.   

 

आज झालेल्या भारताच्या चाळीस वर्षांवरील पुरुष संघाने इंग्लंडविजयवर थरारक विजय साजरा केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या स्कीन मध्ये (चार षटके) सेन ओंगेर्स व शॉन हेंडेर्सन यांनी २८ धावा केल्या तर दुसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) डेविड बाॅल व स्टेफेन यांनी ९ धावा केल्या तर तिसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) स्टुअर्ट वूड व डेविड ब्राॅऊन यांनी ११ धावा केल्या तर चौथ्या व शेवटच्या स्कीन मध्ये (चार षटके) मिचेल जॉनस (कर्णधार)  व अॅरॉन वॅटसन यांनी एकाही धावेची भर घालता न आल्याने इंग्लंड ५४ धावाच धावफलकावर लावू शकली.

 

यानंतर आलेल्या भारतीय संघाने जोरदार लढत देताना पहिल्या स्कीन मध्ये (चार षटके) प्रशांत कारिया (वजा १ धाव, २ विकेट) व नरेश खुराना (वजा ६ धावा, १ विकेट) यांनी ५ धावा केल्या. दुसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) राजीव चंद्रसेकर (५ धावा, १ विकेट) व हिरेन प्रजापती (६ धावा व २ विकेट) यांनी ११ धाव केल्या व तिसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) आलेल्या कर्णधार प्रसन्ना कुमार (१० धावा, १ विकेट) व शम्सीर चिंताविदा ( १७ धावा, १ विकेट) यांनी २७ धावांची भर घालत भारताला मजबूत स्थितीत आणून ठेवले. तर चौथ्या व शेवटच्या स्कीन मध्ये (चार षटके) उपकर्णधार कार्तिकेयन सुब्रमानियन (१४ धावा व २ विकेट) व नागेश सिंग (३ धावा) यांनी भारताला विजय मिळवून दिला. खरतर शेवटच्या जोडीने २७ धावा केल्या होत्या पण चौथ्या शटकात हि जोडी दोन वेळा धावचीत झाल्याने ते १७ धावाच फलकावर लावू शकले. या विजयासह भारत प्लेट फायनल मेध्ये पोहोचला.


पस्तीस वर्षावरील पुरुष गटात भारतीय संघ श्रीलंकेकडून १३७-३२ असा १०५ धावांनी पराभूत झाला. तर तीस वर्षावरील महिला गटात भारताला श्रीलंकेकडून १०३-३५ असा ६८ धावांनी पराभव पत्करावा लागला.     


 
    


Post a Comment

0 Comments