मुंबईच्या मायराने पटकावले जेतेपद
राष्ट्रीय टेबलटेनिस 13 वर्षांखालील मुली गट स्पर्धा
मुंबई, 21 नोव्हेंबर: द सबर्बन टेबलटेनिस असोसिएशनचे (टीएसटीटीए) प्रतिनिधित्व
करणारी मुंबईची प्रतिभावान खेळाडू मायरा सांगेलकर हिने पंचकुला येथे झालेल्या
राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेत युथ गर्ल्स (13 वर्षांखालील)
गटाचे विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्राच्या मायरा सांगेलकरने अंतिम फेरीत पश्चिम
बंगालच्या शरीका शाहिदचा 3-2 अशा
चुरशीच्या लढतीत पराभव केला. मायरा ने आक्रमक सुरुवात करत 2-0 अशी आघाडी घेतली, मात्र शरीकाने तिच्या खेळात
सुधारणा करत पुढील दोन गेम जिंकत 2-2 अशी बरोबरी केली.
निर्णायक पाचव्या गेममध्ये मायरा ने आक्रमकता आणि संयमाचे अनोखे उदाहरण देत 3-2
(11-9, 12-10, 6-11, 9-11, 11-8) अशा फरकाने विजय मिळवला.
निकाल - अंतिम फेरी:
मायरा सांगेलकर (महाराष्ट्र) 3-2 विजयी वि.
शरीका शाहीद (पश्चिम बंगाल)
(11-9, 12-10, 6-11, 9-11, 11-8)
Post a Comment
0 Comments