मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धा
राझमीला हरवून मानव पांचाल उपांत्यपूर्व फेरीत
मुंबई, 21 नोव्हेंबर: मुंबईच्या मानव पांचालने शानदार खेळ करत मुंबईच्याच शाहयान
राझमीवर 4-1 असा अप्रतिम विजय मिळवून मलबार हिल क्लब राज्य
रँकिंग स्पर्धेच्या सीनियर 15-रेड स्नूकर प्रकाराच्या
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मलबार हिल क्लब (एमएचसी) बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या
स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत गुरुवारी मलबार हिल क्लबच्या सदस्य मानवने पहिल्या
तीन फ्रेम्स जिंकून 3-0 अशी
मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या फ्रेममधील 46 गुणांचा ब्रेक त्यात
निर्णायक ठरला. युवा शाहयानने चौथी फ्रेम जिंकली, पण
पांचालने 67-25, 60-26, 71-31, 50-67, 62-32 अशी विजयाची
नोंद केली.
ठाण्याच्या कृष्णा तोहगावकरने उत्कृष्ट खेळ करत पुण्याच्या
गौरव देशमुखचा 4-0 (77-1, 61-30, 58-44 आणि 71-47) असा पराभव करत अंतिम आठ खेळाडूंमध्ये
स्थान मिळवले.
उल्हासनगरच्या सुमीत आहुजाने राउंड ऑफ 16 फेरीत पुण्याच्या सोनू मातंगचा (पुणे) 4-1
असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या दोन
फ्रेम्सनंतर 1-1 अशी बरोबरी असताना तिसऱ्या फ्रेममध्ये
आहुजाने 54 गुणांचा ब्रेकसह आघाडी घेतली. त्यानंतर सातत्य
राखताना 89-56, 25-58, 82-11, 69-25, 79-30 असा विजय मिळवला.
निकाल - सीनियर पुरुष 15-रेड स्नूकर (उप-उपांत्यपूर्व फेरी):
- मानव पांचाल
(मुंबई) विजयी वि. शाहयान राझमी (मुंबई) 4-1 (67-25, 60(46)-26, 71-31, 50-67, 62-32)
- कृष्णा
तोहगावकर विजयी वि. गौरव देशमुख (पुणे) 4-0 (77-1, 61-30, 58-44, 71-47)
- सुमीत आहुजा
(उल्हासनगर) विजयी वि. सोनू मातंग (पुणे) 4-1 (89-56, 25-58, 82(54)-11, 69-25, 79-30)
- युधिष्ठिर
जयसिंग (मुंबई) विजयी वि. अभिजीत रानडे (पुणे) 4-3 (29-65, 87-48, 88-11, 18-84 (44), 66-53, 48-56,
68 (40)-61)
Post a Comment
0 Comments