Type Here to Get Search Results !

आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

 


आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

मुंबई : लोकमान्य शिक्षण संस्थेच्या शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन जिम्नॅस्टिक्स केंद्रात सराव करणाऱ्या विविध शाळेतील एकूण १३ खेळाडूंनी पुण्याच्या बालेवाडी येथील शालेय राज्यस्तरीय ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करताना मोठे यश मिळवले. या स्पर्धेत एकूण ५ प्रकारांपैकी ४ प्रकारात ९ सुवर्ण व १ प्रकारात ४ रौप्य पदकं पटकावून मुंबई जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. त्यातले ९ खेळाडूंची कोलकत्ता येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यशस्वी खेळाडूंना महेंद्र चेंबुरकर, योगेश पवार, राहुल ससाणे, सुनील रणपिसे आणि रमेश सकट यांचे मार्गदर्शन लाभले. लोकमान्य शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. सुबोध आचार्य, सचिव श्री. माणिक पाटील आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडू, शिक्षक आणि पालकांचे विशेष अभिनंदन केले.

पदक विजेते खेळाडू:

  • वूमेन्स पेअर - २ सुवर्ण

    1. काव्या कुंडे - चेंबूर इंग्लिश हायस्कूल
    2. साक्षी गावडे - एस.एम.टी. हिंदुजा नॅशनल सरोदय हायस्कूल
  • मेन्स पेअर - २ सुवर्ण

    1. दीक्षांत ससाणे - स्वामी विवेकानंद हायस्कूल
    2. समर्थ खन्नूकर - श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन
  • वूमेन्स ग्रुप - १ सुवर्ण

    1. विशाखा दोरगे - स्वामी विवेकानंद जुनिअर कॉलेज
    2. रुणल रणपिसे - लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूल
    3. श्रद्धा मोहिते - सेंट अँथोनीस गर्ल्स स्कूल
  • मिक्स पेअर - १ सुवर्ण

    1. आदित्य दिघे - चेंबूर कर्नाटक जुनिअर कॉलेज
    2. भूमिका भारंभे - स्वामी विवेकानंद जुनिअर कॉलेज
  • मेन्स ग्रुप - १ रौप्य

    1. अश्विन गोसावी - एन.जी. आचार्य आणि डी.के. मराठे कॉलेज
    2. नमन महावर - के.जे. सोमय्या जुनिअर कॉलेज
    3. यज्ञेश भोस्तेकर - सेंट सॅबेस्टियन हायस्कूल
    4. नमो उनियाल - स्वामी विवेकानंद हायस्कूल

Post a Comment

0 Comments