राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धा 2024
सरला फायबर्स संघ पात्रता फेरीत अव्वल स्थानी
मुंबई, 14 नोव्हेंबर: सरला फायबर्सने सर्वोत्तम सांघिक
कामगिरीच्या जोरावर फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) आणि बॉम्बे जिमखाना द्वारे आयोजित प्राइम सिक्युरिटीज-राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धा 2024 च्या मिश्र संघ स्पर्धेच्या पात्रता स्विस लीगमध्ये अव्वल स्थान राखले.
सरला फायबर्स संघात वृंदा झुनझुनवाला, राजीव खंडेलवाल, हिमानी
खंडेलवाल, संदीप करमरकर आणि मारियान करमरकर यांचा समावेश
आहे. या संघाने एकच सामना गमावला असून 108 व्हीपीज (Victory
Points) पूर्ण केले.
टीम जेसल 90.38 व्हीपीजसह दुसऱ्या तर टीम स्लॅमर्स 89.80 व्हीपीजसह
तिसऱ्या स्थानावर आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या बाद फेरीसाठी अव्वल आठ संघ पात्र
ठरले आहेत, त्यात सरला फायबर्स, टीम
जेसल, टीम स्लॅमर्स, टीम एसिंग इट,
हेक्झा स्क्वॉड, टीम स्नॅपड्रॅगन, टीम हार्मनी आणि वॉरियर्सचा समावेश आहे.
मिक्स्ड पेअर्स इव्हेंटलाही चांगला प्रतिसाद लाभला आहे, ज्यामध्ये 79 जोड्यांचा
समावेश आहे. या प्रकारातील स्पर्धा वीकेंडला सुरू होतील.

Post a Comment
0 Comments