Type Here to Get Search Results !

मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा सातत्यपूर्ण खेळामुळे राजारवालचा शेखवर 3-2 असा विजय



मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा


सातत्यपूर्ण खेळामुळे राजारवालचा शेखवर 3-2 असा विजय


मुंबई, 14 नोव्हेंबर: मराठवाड्याच्या चेतन राजारवालने सातत्य राखत नागपूरच्या झुबेर शेखवर मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेतील बेस्ट ऑफ फाइव्ह फ्रेम्स '15-रेड' स्नूकर फेरीत 3-2 असा सनसनाटी विजय मिळवला.

मलबार हिल क्लब (एमएचसी) बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत राजारवालने पहिली फ्रेम गमावूनही शेखला 46-47, 64-11, 66-07, 25-54, 88-1 असे पराभूत केले.

त्यानंतर, अनुभवी अनुराग बागरीने 30, 46 आणि 40 अशा छोटेखानी परंतु महत्त्वपूर्ण ब्रेकसह मराठवाड्याच्या आमिर अन्सारीवर 3-0 (55-15, 80-8, 67-29) अशी मात केली.

यावेळी, मुंबईच्या हसन बदामी या आणखी एका अनुभवी क्यूईस्टने नाशिकच्या जगदीश कुर्मीवर 3-0 (66-08, 69-30, 66-13) असा विजय मिळवला.

मुंबईचा युवा खेळाडू शाहयान रझमीने डोंबिवलीच्या आशित पंड्याला 3-1 (9-65, 74-30, 78-45, 65-17) असा पराभव केला. कृष्णा तोहगावकरने (ठाणे) आशित पंड्यावर 3-1 (71-10, 54-22, 51-58, 61-52) अशी मात केली.



निकाल – 15-रेड स्नूकर:

  • निखिल आहुजा विजयी, समय वाधवनवर 3-2 (5-80(48), 58-65, 64-21, 67-61, 63-26)
  • सुमीत आहुजा (उल्हासनगर) विजयी, आकाश ठक्करवर 3-2 (8-59, 59(44)-26, 37-46, 55-45, 71(49)-62)
  • अमरदीप घोडके (पुणे) विजयी, कैझाद फिटरवर 3-1 (29-64, 60-34, 55-33, 57-33)
  • अनुराग शर्मा (मराठवाडा) विजयी, विशाल बैसवर 3-2 (59-21, 12-48, 37-65, 66-18, 64-30)
  • सिद्धार्थ तांबे (पुणे) विजयी, निखिल सैगलवर 3-2 (70-31, 79-35, 26-75, 11-66(30), 65-38)
  • चिराग रामकृष्णन विजयी, सुनील जैनवर 3-1 (33-50, 68-24, 69-20, 52-12)
  • चेतन राजरवाल (मराठवाडा) विजयी, झुबेर शेख (नागपूर)वर 3-2 (46-47, 64(33)-11, 66(34)-07, 25-54, 88(76)-1)

 


Post a Comment

0 Comments