महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन २०२४
मेहेंदळे, कर्णिक तिसऱ्या फेरीत!
मुंबई, 14 नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज
दोन प्रमुख खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला. अग्रमानांकित तनय मेहेंदळे आणि दुसरे
मानांकित श्वेतांक कर्णिक हे दोन्ही खेळाडू ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन आणि
एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या योनेक्स सनराइज-महाराष्ट्र
राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केले.
विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबच्या कोर्टवर गुरुवारी झालेल्या
दुसऱ्या फेरीच्या चुरशीच्या सामन्यात मेहेंदळेने शिवम चौरेला केवळ 21
मिनिटांत 30-19 अशा फरकाने मात दिली. त्याच वेळी,
बाजूच्या कोर्टवर कर्णिकने अरित्रा सरकारविरुद्ध 11
मिनिटांत 30-7 असा विजय मिळवला.
तितकेच रोमांचक दुसऱ्या लढतीत युवा हर्षित माहीमकरने कनिष्क
गुर्रमला 17 मिनिटांत
30-23
असे हरवले. अनय पिंगुळकरने यश भोंगळेवर 30-28
असा थोडक्यात विजय मिळवला, तर पियुष कांबळेने सुमीत माडेवर 30-28
अशी कडक लढत जिंकली.
पुरुष एकेरी फेरीतल आणखी काही महत्त्वाची लढती:
Ø 1-तनय
मेहेंदळे विजयी वि. शिवम चौरे 30-19; 2
Ø श्वेतांक कर्णिक विजयी वि. अरित्र सरकार 30-7;
Ø सोहम पाटील विजयी वि. सार्थक कुलकर्णी ३०-२५;
Ø अभिनव सिंग विजयी वि. अभिषेक भागवत ३०-२५;
Ø अनय पिंगुळकर विजयी वि. यश भोंगळे ३०-२८;
Ø देवम देसाई विजयी वि. अनुप रत्नपारखी 30-25;
Ø चिरायू भोबू विजयी वि. सागर डेकाटे ३०-२७;
Ø ओम महाजन विजयी वि. सार्थक वाडेकर ३०-२६;
Ø सलाज मेघराज विजयी वि. आदित्य शर्मा ३०-२६;
Ø हर्षित माहिमकर विजयी वि. कनिष्क गुर्रम 30-23;
Ø आर्यन वर्मा विजयी वि. विनित शेलार 30-27;
Ø दारस नाडर विजयी वि. अयान कुलकर्णी 30-27;
Ø पियुष कांबळे विजयी वि. सुमीत माडे ३०-२८;
निखिल चारी विजयी वि. कृष्णा भट्टड 30-26.

Post a Comment
0 Comments