कामगार महर्षी आंबेकर स्मृती शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा
१० डिसेंबरपासून
मुंबई: कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती आंतर शालेय-कॉलेज
मोफत कॅरम स्पर्धा १० ते १२ डिसेंबर दरम्यान परळ येथील आरएमएमएस वातानुकुलीत
सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे संस्थापक स्व.
गं.द. आंबेकर यांच्या स्मृतीदिन सप्ताहानिमित्त ही स्पर्धा भरविण्यात येत असून,
आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित
करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्देश कामगारांच्या मुलामुलींना प्रोत्साहन देणे
हा आहे.
स्पर्धेचे वैशिष्ट्ये:
- स्पर्धा
१६ वर्षांखालील शालेय गट
आणि
१९ वर्षांखालील कॉलेज गट
अशा दोन गटांत होणार आहे.
- सहभागी
खेळाडूंना तज्ञ मंडळींकडून मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.
- चॅम्पियन
कॅरम बोर्डावर होणाऱ्या या स्पर्धेत दोन्ही गटातील पहिल्या आठ विजेते व
उपविजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
विशेष व्यवस्था:
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने परगावाहून येणाऱ्या
डीएसओ जिल्हा पातळीवरील निवड झालेल्या खेळाडूंसाठी राहण्याची विशेष व्यवस्था
करण्यात येणार आहे. या आयोजनासाठी निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर आदी पदाधिकारी विशेष प्रयत्नशील आहेत.
संपर्क व नोंदणी:
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी १ डिसेंबरपूर्वी
आपला प्रवेश अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण किंवा क्रीडा
शिक्षक अविनाश महाडिक (मोबाईल क्रमांक: ९००४७ ५४५०७) यांच्याशी संपर्क साधावा.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने आयोजित होणारी ही
स्पर्धा नवोदित व उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments