Type Here to Get Search Results !

28वी अजित नाईक स्मृती 14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा

 


28वी अजित नाईक स्मृती 14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा

एमआयजी क्रिकेट अकॅडमीला 143 धावांमध्ये रोखले

फिरकीपटू निखिल गुरवचा भेदक मारा

 

मुंबई: एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबच्या डावखुऱ्या फिरकीपटू निखिल गुरवच्या भेदक गोलंदाजीने (27 धावांत 6 विकेट) एमआयजी क्रिकेट अकॅडमीचा पहिला डाव 53.4 षटकांत 143 धावांवर आटोपला. 28व्या अजित नाईक स्मृती निवडचाचणी 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील दोन दिवसीय उपांत्य सामन्याच्या पहिल्या दिवशी हा सामना एमआयजी सीसी मैदानावर खेळला जात आहे.

 

एमआयजीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, परंतु निखिलच्या अचूक माऱ्यासमोर मधली फळी कोसळली. वेदांग मिश्रा (40), प्रद्न्यांकुर भालेराव (34) आणि दर्शन ओझा (30) यांनी संयम दाखवत संघाला दीडशेपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात, एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबने दिवसअखेर 28 षटकांत 4 बाद 107 धावा करून विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. हर्ष कदमने नाबाद 46 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली.

 

दुसऱ्या उपांत्य सामन्यात, सोव्हेनियर सीसीचा पहिला डाव 40 षटकांत 139 धावांत संपुष्टात आला. शिव त्रिपाठीने 39 धावा करत आघाडीची कामगिरी केली. इस्लाम जिमखान्याचा अबरार शेख (4/40) आणि आदित्य पांडे (3/35) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात, इस्लाम जिमखान्याने दिवसअखेर 11 षटकांत 3 बाद 39 धावा केल्या असून तिन्ही विकेट शिव त्रिपाठीने घेतल्या.

 

उपांत्य फेरी - संक्षिप्त धावफलक:

सोव्हेनियर सीसीपहिला डाव: 40 षटकांत सर्वबाद 139 (शिव त्रिपाठी 39; अबरार शेख 4/40, आदित्य पांडे 3/35) वि.

इस्लाम जिमखानापहिला डाव: 11 षटकांत 3 बाद 39 (शिव त्रिपाठी 3/11).

 

एमआयजी क्रिकेट अकॅडमीपहिला डाव: 53.4 षटकांत सर्वबाद 143 (वेदांग मिश्रा 40, प्रद्न्यांकुर भालेराव 34, दर्शन ओझा 30; निखिल गुरव 6/27) वि.

एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबपहिला डाव: 28 षटकांत 4 बाद 107 (हर्ष कदम नाबाद 46).

 

फोटो: एम. व्ही. स्पोर्ट्स क्लबचा डावखुरा फिरकीपटू निखिल गुरवने 27 धावांत 6 विकेट घेतल्या.


Post a Comment

0 Comments