5वी अर्जुन मढवी स्मृती महिला चषक स्पर्धा
राजावाडी क्रिकेट क्लबचा उपांत्य फेरीत प्रवेश
क्षमा पाटेकरचा अष्टपैलू खेळ
ठाणे: सलग दुसऱ्या सामन्यात सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू
ठरलेल्या क्षमा पाटेकरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे गतविजेत्या राजावाडी क्रिकेट
क्लबने व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा सात विकेट्सनी पराभव करत डॉ. राजेश मढवी
स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. क्षमा पाटेकरने नाबाद अर्धशतकी
खेळीसह तीन बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रथम फलंदाजी करताना व्हिक्टरी क्रिकेट क्लबने ४० षटकांत ९
बाद १८६ धावा केल्या. प्रिशा देवरुखकरने जबाबदारीने खेळ करत ४४ धावा केल्या,
तर नंदिता त्रिवेदी आणि क्रितीका यादव यांनी प्रत्येकी २७
धावांचे योगदान दिले. अलिना मुल्लाने २२ धावा केल्या. राजावाडीच्या गोलंदाजांपैकी
क्षमा पाटेकरने ८ षटकांत ३५ धावांत ३ बळी घेतले, तर दिशा पवारने ८ षटकांत ३० धावांत २ गडी बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजावाडीच्या सलोनी कुष्टेने ६६
धावांची अर्धशतकी खेळी करत दोन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचल्या. किमया राणेसह
पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली, तर क्षमा पाटेकरच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावा
जोडल्या. किमया राणेने २७ धावा केल्या. विजयावर शिक्कामोर्तब करताना क्षमाने नाबाद
५५ धावा केल्या, तर
निव्या आंब्रे नाबाद १० धावांवर राहिली. व्हिक्टरीकडून पूजा शाहने २ बळी घेतले,
तर विधी मथुरियाला १ बळी मिळाला.
संक्षिप्त धावफलक:
व्हिक्टरी क्रिकेट क्लब: ४० षटकांत ९ बाद १८६
(प्रिशा देवरुखकर ४४, नंदिता त्रिवेदी २७, क्रितीका यादव २७, अलिना मुल्ला २२; क्षमा पाटेकर ८-३५-३, दिशा पवार ८-३०-२, वैष्णवी पोतदार ५-३३-१, निव्या आंब्रे ८-२२-१, निवेदी जैतपाल ४-१९-१)
राजावाडी क्रिकेट क्लब: ३१.३ षटकांत ३ बाद १९०
(सलोनी कुष्टे ६६, क्षमा पाटेकर नाबाद ५५, किमया राणे २७, निव्या आंब्रे नाबाद १०; पूजा शाह ८-४४-२, विधी मथुरिया ७.३-४१-१)
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू: क्षमा पाटेकर (राजावाडी क्रिकेट क्लब).
Post a Comment
0 Comments