Type Here to Get Search Results !

आंतरकॉलेज मल्लखांब स्पर्धेत जान्हवी, ऋषभ चमकले

 


आंतरकॉलेज मल्लखांब स्पर्धेत जान्हवी, ऋषभ चमकले

 

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन मल्लखांब स्पर्धेत महिलांमध्ये एम. एल. डहाणुकर महाविद्यालयाच्या जान्हवी जाधवने, तर पुरुषांमध्ये एल. एस. रहेजा महाविद्यालयाच्या ऋषभ गुबाडेने वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक पटकावला.

 

ही स्पर्धा एल. एस. रहेजा महाविद्यालयात संपन्न झाली. या स्पर्धेचे आयोजन डॉ. मनोज रेड्डी (संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ), डॉ. देबजित सरकार (प्राचार्य, एल. एस. रहेजा महाविद्यालय) आणि द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त श्री. गणेश देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

 

स्पर्धेचा निकाल:

वैयक्तिक गट:

महिला: प्रथम: जान्हवी जाधव (एम. एल. डहाणुकर महाविद्यालय)

पुरुष: प्रथम: ऋषभ गुबाडे (एल. एस. रहेजा महाविद्यालय)

सांघिक गट:

महिला:

प्रथम: विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, द्वितीय: एम. एल. डहाणुकर महाविद्यालय, तृतीय: भावन्स महाविद्यालय

पुरुष:

प्रथम: एम. एल. डहाणुकर महाविद्यालय, द्वितीय: अण्णा लीला महाविद्यालय, तृतीय: भावन्स महाविद्यालय


Post a Comment

0 Comments