आंबेकर स्मृती कॉलेज बुद्धिबळ स्पर्धा
प्रतिक, देवेन, करण, हर्षदा आघाडीवर
मुंबई: राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ,
आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कामगार
महर्षी जी.डी. आंबेकर प्रतिष्ठान कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या
साखळी फेरीअखेर प्रतिक कनोजिया, देवेन बनसोडे, करण कदम, आणि हर्षदा साळुंखे यांनी प्रत्येकी दोन
गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे.
पहिल्या पटावर प्रतिक कनोजियाने चिन्मय मेस्त्रीच्या
कौशल्यपूर्ण चालींना यशस्वी शह देत २१ व्या मिनिटाला विजय मिळवला.
दुसऱ्या पटावर: देवेन बनसोडेने
कौस्तुभला पराभूत केले, हर्षदा साळुंखेने गौरवला हरवले, करण कदमने नैनील शिखरेवर विजय मिळवून आपला दुसरा गुण मिळवला.
स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्या वैशाली घेगडमल, मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सचिव आणि फिडे
इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते
लीलाधर चव्हाण, आणि पंच चंद्रकांत करंगुटकर यांच्या
उपस्थितीत झाले.
आगामी कॅरम स्पर्धा
कामगार महर्षी स्व. गं. द. आंबेकर स्मृती आंतर शालेय आणि
कॉलेज मुलामुलींच्या विनामूल्य कॅरम स्पर्धेला १० डिसेंबर रोजी सकाळी १०
वाजता परळ येथील आरएमएमएस सभागृहात प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणारे काही प्रमुख खेळाडू:
ज्युनियर कॅरमपटू : मिहीर शेख
कॉलेज प्रतिनिधीत्व : व्हिवा कॉलेज-विरारचा भव्या सोळंकी, रुपारेल कॉलेजचा कुणाल जाधव, जन गण मन
कॉलेज-कल्याणचा गिरीश पवार, पोद्दार कॉलेजची रुची माचीवले
शालेय प्रतिनिधीत्व :पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, डॉ. अँटोनियो
दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर
पठाण
या स्पर्धेत एकूण ११२ नामवंत खेळाडू सहभागी होणार असून
दर्जेदार कॅरम खेळाचे दर्शन परळकरांना घडणार आहे.
उद्घाटन सोहळा: संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे सरचिटणीस
गोविंदराव मोहिते, खजिनदार
निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, आणि सुनील बोरकर यांच्या उपस्थितीत
होणार आहे.
Post a Comment
0 Comments