कामगार महर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून
ध्रुव गटविजेता
मुंबई: राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र
राज्य राष्ट्रीय कामगार संघ, आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कामगार महर्षी स्व. गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील
बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने गटविजेतेपद
पटकावले. ध्रुवने अपराजित अंशुमन समळला (३.५) २५ व्या मिनिटाला बरोबरीत रोखून सरस
सरासरीच्या जोरावर विजेतेपद मिळवले. परिणामी, अंशुमनचा दुहेरी विजयाचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
महत्त्वाचे निकाल:
१३ वर्षांखालील गट: अंशुमन समळला
गटविजेता
११ व १२ वर्षांखालील मुलींचा गट: अरेना फिडे
मास्टर हिरण्मयी कुलकर्णीने सर्वाधिक गुण मिळवत दुहेरी विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे आयोजन परळ येथील आरएमएमएस वातानुकूलित सभागृहात
करण्यात आले होते. ८, १०, व १२ वर्षांखालील गटांमध्ये मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग
घेतला.
इतर गटांतील विजेते:
८ वर्षांखालील मुलं: रीयांश कदम (५ गुण), अंगद पाटील (४ गुण), अधवान ओसवाल (३
गुण)
८ वर्षांखालील मुली: मायरा गोगरी (३ गुण), ध्रुवा भोसले (३ गुण), समैरा थोरात (२
गुण)
१० वर्षांखालील मुलं: राज गायकवाड (४.५ गुण), अर्णव साठ्ये (३.५ गुण), शौर्य
कोठारी (३.५ गुण)
१० वर्षांखालील मुली: थिया वागळे (४.५ गुण), आराध्या पुरो (२.५ गुण), स्वरा मोरे
(२ गुण)
१२ वर्षांखालील मुलं: व्ही. प्रिजेश (४.५ गुण), युग संघवी (४ गुण), पी. रेयान (३
गुण)
मुंबई, ठाणे, पालघर, आणि पुणे जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित
सब-ज्युनियर बुद्धिबळपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेच्या यशस्वी
आयोजनाबद्दल मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सचिव आणि फिडे इंस्ट्रक्टर
राजाबाबू गजेंगी यांनी कौतुक व्यक्त केले.
विजेते व उपविजेते यांचा सत्कार राष्ट्रीय मिल
मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने संघाचे सरचिटणीस
गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रमुख सुनील बोरकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते
करण्यात आला.
Post a Comment
0 Comments