एनबिए बास्केटबॉल स्पर्धा
महिंद्रा पार्कच्या विजयात हृदिनी सावर्डेकर चमकली
मुंबई : महिंद्रा
पार्कने एनबीए बास्केटबॉल स्पर्धेच्या 18 वर्षांखालील
मुलींच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात यजमान नागपाडा बास्केटबॉल असोसिएशनविरुद्ध 47-35
(हाफटाईम: 18-24) असा संघर्षपूर्ण विजय
मिळवला.
नागपाडा येथील बच्चू खान स्मृती म्युनिसिपल प्लेग्राउंडवर
फ्लडलाइट्सखाली खेळल्या गेलेल्या या सामन्यात महिंद्रा पार्कसाठी शूटर हृदिनी
सावर्डेकरने 17 गुण नोंदवून
महत्त्वाचा वाटा उचलला. लारन्या अमीन (13 गुण) आणि ग्रेस
परेरा (10 गुण) यांनी तिच्या कामगिरीला चांगली साथ दिली.
नागपाडा बास्केटबॉल असोसिएशनकडून लक्ष्मी गुप्ता (14 गुण)
आणि सायरा शाह (12 गुण) यांनी संघर्षपूर्ण खेळ केला, मात्र त्यांना पराभव टाळता आला नाही.
निकाल:
18 वर्षांखालील मुली:
महिंद्रा पार्क (हृदिनी सावर्डेकर 17, लारन्या अमीन 13, ग्रेस
परेरा 10) 47-35 विजयी
वि. नागपाडा बास्केटबॉल असोसिएशन (लक्ष्मी गुप्ता 14, सायरा शाह 12) (हाफटाईम: 18-24)
14 वर्षांखालील मुले:
पी.व्ही. गरोडिया (श्रीनिवास परब 20) 32-17 विजयी वि. सेंट मेरीज (झाहू दास 15)
(हाफटाईम: 32-3), कॅम्पियन स्कूल (श्रीकृष्ण एम. 12, रेयांश एस. 6)
41-17 विजयी वि. ग्रीन एकर्स (हृदय एम. 6) (हाफटाईम: 19-5)
फोटो: महिंद्रा
पार्कच्या हृदिनी सावर्डेकरने (डावीकडे) 17 गुण आणि ग्रेस परेराने 10 गुण नोंदवून संघाच्या
विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
Post a Comment
0 Comments