आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा
उपांत्य फेरीत ब्रीच कॅन्डी विरुद्ध जे.जे. हॉस्पिटल – रंगणार थरारक सामना!
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर
रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल आणि
जे.जे. हॉस्पिटल आमनेसामने येणार असून हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी रोमहर्षक ठरणार
आहे. शिवाजी पार्क मैदानावर सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ
आपल्या पूर्ण ताकदीने विजयासाठी लढतील.
स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात नानावटी हॉस्पिटल आणि कोकिळाबेन धीरूभाई अंबानी (केडीए)
हॉस्पिटल यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळेल. हा सामना शशी केडिया, शौनक संख्ये, अशोक चंद्रावत, जाशुकभाई झवेरी, राजेश शाह यांसारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार आहे.
पहिला उपांत्य सामना : ब्रीच कॅन्डी विरुद्ध जे.जे.
हॉस्पिटल – कोण मारणार बाजी?
ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलच्या विजयासाठी कर्णधार प्रदीप क्षीरसागर,
अष्टपैलू शंतनू मोरे,
रोहन महाडिक,
मनोज कांबळे
यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्यांना जे.जे. हॉस्पिटलचे कर्णधार नरेश शिवतरकर, सुभाष शिवगण, अष्टपैलू अभिजित मोरे, जगदीश वाघेला आणि यष्टीरक्षक विलास जाधव कडवे आव्हान देतील.
दुसरा उपांत्य सामना : नानावटी हॉस्पिटल विरुद्ध केडीए
हॉस्पिटल – शतकवीर ओमकार जाधवचा कस लागणार!
दुसऱ्या उपांत्य सामन्यात नानावटी हॉस्पिटलचे कर्णधार व स्पर्धेतील पहिले शतकवीर
ओमकार जाधव, प्रणव हरियान, दिनेश पवार, किशोर कुयेस्कर, प्रतिक पाताडे आणि विशाल चतुर्वेदी यांचा अष्टपैलू खेळ
केडीए हॉस्पिटलला दडपणात टाकू शकतो. मात्र, केडीए हॉस्पिटलच्या विजयाची जबाबदारी कर्णधार देवेंद्र
भानसे, अष्टपैलू
दीपक सिंग, डॉ. हर्षल वाघ, अल्केत तांडेल आणि करण पाटोळे यांच्यावर असेल.
स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी होणाऱ्या दोन्ही लढती अत्यंत
महत्त्वाच्या आहेत. ब्रीच कॅन्डी आणि जे.जे. हॉस्पिटल यांच्यातील पहिला सामना
तसेच नानावटी आणि केडीए हॉस्पिटल यांच्यातील दुसरा सामना कोण जिंकणार?
अंतिम फेरीत कोण धडक
मारणार? याची
उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये शिगेला पोहोचली आहे!

Post a Comment
0 Comments