शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत विकास आणि काजलला अव्वल
मानांकन
मुंबई: १६ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला
८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता प्रारंभ होणार आहे.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन
व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने आयोजित आणि सारस्वत बँकेच्या पुरस्काराने सन्मानित या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात ३०० आणि महिला एकेरी गटात ४४ खेळाडू
सहभागी झाले आहेत.
पुरुष एकेरी गटात मुंबईच्या विकास धारियाला,
तर महिला एकेरी गटात मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेतील काही प्रमुख
सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवर
करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील मानांकन:
पुरुष एकेरी गट: १. विकास धारिया (मुंबई), २. महम्मद घुफ्रान
(मुंबई), ३. सागर वाघमारे
(पुणे), ४. रिझवान उस्मान शेख
(मुंबई उपनगर), ५. योगेश परदेशी
(पुणे), ६. झैद अहमद फारुकी
(ठाणे), ७. संजय मांडे
(ठाणे), ८. संदीप दिवे
(मुंबई उपनगर)
महिला एकेरी गट: १, काजल कुमारी (मुंबई), २. मधुरा देवळे
(ठाणे), ३. समृद्धी घाडीगावकर
(ठाणे), ४. दीक्षा चव्हाण
(सिंधुदुर्ग), ५. प्राजक्ता
नारायणकर (मुंबई
उपनगर), ६. आकांक्षा कदम (रत्नागिरी), ७. रिंकी कुमारी
(मुंबई), ८. केशर निर्गुण
(सिंधुदुर्ग)
स्पर्धेतील रोमांचक सामने पाहण्यासाठी महाराष्ट्र कॅरम
असोसिएशनच्या युट्युब चॅनलला भेट द्या!

Post a Comment
0 Comments