वसईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद
मुंबई... ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या अंतिम सामन्यात वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूलने मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथील या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर संघावर सात गडी राखून सहज विजय मिळवला.
मुंबई उपनगर संघाकडून जस्टीनने सर्वात अधिक 15 धावा केल्या, तर सिद्धांतने 14 धावा केल्या. सूर्योदय आरबीएल स्कूलच्या अनुज त्रिपाठीने एकाच षटकात दोन गडी बाद केले.
56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्योदय आरबीएल स्कूलचा पहिला गडी रोहन गुटाल शून्य धावांवर बाद झाला. मात्र, अनुज त्रिपाठीने 15 धावा करत संघाच्या धावांचा पाठलाग सुरेखपणे केला. त्याला रोहित पोथेन आणि ओबेद डायस यांनी 10-10 धावा करून उत्तम साथ दिली. लवेश डऊलने 6 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
आखिरीत, अनुज त्रिपाठीला उत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्र रक्षकाचा पुरस्कार ओबेद डायसला देण्यात आला.
विजयी संघातील सर्व खेळाडूंचे तसेच क्रीडा शिक्षक अविनाश महाडीक, शिक्षक शंकर परब, स्टेफी टिचर आणि महिमा टिचर यांचे प्रिन्सिपल अनुसया प्रधान मॅम यांनी विशेष अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments