Type Here to Get Search Results !

टाइम्स शील्ड क्रिकेट स्पर्धा ओरिएंटल इन्शुरन्सचा दमदार विजय! टाटा एआयए इन्शुरन्सवर ७ विकेट्स राखून मात

 


टाइम्स शील्ड क्रिकेट स्पर्धा

ओरिएंटल इन्शुरन्सचा दमदार विजय!

टाटा एआयए इन्शुरन्सवर ७ विकेट्स राखून मात

 

मुंबई : टाइम्स शील्ड क्रिकेट स्पर्धेच्या एफ डिव्हिजन सामन्यामध्ये  ओरिएंटल इन्शुरन्सने टाटा एआयए इन्शुरन्सवर ७ विकेट राखून विजय मिळवला. सोहम चुरीचा अष्टपैलू खेळ त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

 

टाटा एआयएची २०० धावांपर्यंत मजल

क्रॉस मैदानावर झालेल्या लढतीत सोमवारी टाटा एआयए इन्शुरन्सने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २०० धावा केल्या. प्रतिक पुजारीने सर्वाधिक ५७ धावा करताना त्यात मोलाचे योगदान दिले. शार्दुल नाईकने ४३ धावा काढत त्याला चांगली साथ दिली. ओरिएंटल इन्शुरन्सकडून अथर्व कांबळे (2/30), तरुण बोस (2/33) आणि सोहम चुरीने (2/11) प्रभावी गोलंदाजी केली.

 

ओरिएंटल इन्शुरन्सकडून सहज विजय

प्रतिस्पर्ध्यांचे २०१ धावांचे आव्हान ओरिएंटल इन्शुरन्सने ३ विकेटच्या बदल्यात पार केले. सुमेध निकानीच्या 59 चेंडूत 60 धावा फटकवताना विजयाचा पाया रचला. अमन वर्मा (41 चेंडूत 43 धावा), सोहम चुरी (52 चेंडूत 44*) आणि धीर शाहने (36 चेंडूत 32*) त्याच्याच तोडीसतोड फलंदाजी करताना विजय सुकर केला. 

 

सोहम चुरी ठरला सामना विजेता!

गोलंदाजी आणि फलंदाजीत केलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे सोहम चुरी हा सामन्याचा नायक ठरला. त्याच्या अष्टपैलू खेळामुळे ओरिएंटल इन्शुरन्सने एफ डिव्हिजनमध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.


Post a Comment

0 Comments