रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरतर्फे राज्य कॅरम स्पर्धेचे
आयोजन
मुंबई, रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरतर्फे ५ वी रोटरी क्लब ऑफ
मुंबई पार्लेश्वर राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन २९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, शहाजी राजे मार्ग, विले पार्ले (पूर्व), मुंबई येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन छत्रपती
शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू, मुंबई यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांत
स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे उत्कर्ष स्मॉल फायनान्स
बँकेने सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेसाठी दिलेला पुरस्कार,
ज्यामध्ये विजेत्यांना एकंदर १ लाख १० हजारांची रोख
पारितोषिके व चषक दिले जातील.
स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज
www.maharashtracarromassociation.com या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. नोंदणीसाठी अंतिम
तारीख १० मार्च २०२५ आहे. खेळाडूंनी आपली नावे नोंदवण्यासाठी आपल्या जिल्हा कॅरम
संघटनेशी संपर्क साधावा. मुंबईतील खेळाडूंच्या नोंदणीसाठी दिनांक १० मार्च २०२५
रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत महाराष्ट्र कॅरम असोसिएशन,
पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी चौक जवळ, शिवाजी पार्क, दादर येथे नोंदणी केली जाईल.
ही स्पर्धा कॅरम खेळाडूंना आपली कौशल्ये सिद्ध करण्यासाठी
उत्तम संधी उपलब्ध करून देईल, आणि स्पर्धेचे आयोजन क्रीडायोजना, एकता व समाजसेवेसाठी महत्त्वाची ठरेल.

Post a Comment
0 Comments