Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रमाकांत कहाणे यांचे निधन


ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रमाकांत कहाणे यांचे निधन

 

मुंबई, आयकर कला आणि क्रीडा मंडळ तसेच श्री स्वयंभू रामेश्वर क्रिडा मंडळाचे माजी चतुरस्त्र कबड्डी खेळाडू रमाकांत महादेव कहाणे यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. कबड्डी क्रीडासृष्टीतील एक दिग्गज, रमाकांत कहाणे यांचे निधन क्रीडा क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे.

 

ते श्री स्वयंभू रामेश्वर को-ऑप. हौसिंग सोसायटी (कल्याणदास वाडी) चे सन्माननीय अध्यक्ष होते आणि बृहन्मुंबई तेली समाज संस्थेचे माजी पदधिकारी देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे.

 

रमाकांत कहाणे हे कबड्डीच्या मैदानावर एक अत्यंत उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखले जात. विशेषत: एकेरी पट काढण्यात ते अत्यंत माहीर होते आणि उजव्या बगलेतून चढाई करत असत. त्यांच्या हातातील उत्कृष्ट गडी बाद करण्याची कला अनेकांनी आदर्श मानली.

 

त्यांचे निधन केवळ क्रीडा क्षेत्रासाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांसाठीही अत्यंत मोठा धक्का आहे. भोईवाडा हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

क्रीडा क्षेत्रातील या महान व्यक्तिमत्वाचा कायमचा विस्मयकारक ठसा राहिला आहे.

 


Post a Comment

0 Comments