कोल्हापूर राज्य कॅरम स्पर्धेत आकांक्षा कदम व सागर वाघमारे
चमकले विजयी तिरकस!
मुंबई : शंभूराजे फ्रेंड्स सर्कल, कोल्हापूर यांच्या वतीने व आमदार सतेज पाटील यांच्या
वाढदिवसानिमित्त आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा थरारक वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेच्या अंतिम
सामन्यांमध्ये पुण्याच्या सागर वाघमारे आणि रत्नागिरीच्या आकांक्षा कदम यांनी आपापल्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवत विजेतेपद
पटकावले.
पुरुष एकेरी अंतिम फेरीत:
सागर वाघमारेने मुंबईच्या विकास धारिया याला २४-१४,
२५-१५ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून आपल्या अचूकतेची
आणि अनुभवाची छाप सोडली.
महिला एकेरी अंतिम फेरीत:
रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने सिंधुदुर्गच्या केशर
निर्गुणवर २५-७, २५-१५
अशी वर्चस्वपूर्ण मात करत महिला गटाचे विजेतेपद पटकावले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत:
प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) हिने मधुरा देवळे (ठाणे) हिला पराभूत करत महिला गटातील तिसरे स्थान मिळवले.
अभिजीत त्रिपानकर (पुणे) याने पंकज पवार (ठाणे) याला हरवत पुरुष गटात तिसरे स्थान पटकावले.
विजेते आणि उपविजेते प्रथम आठ खेळाडूंना रोख पारितोषिके व चषक
प्रदान करण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी महाराष्ट्र कॅरम
असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव योगेश फणसळकर, कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशनचे सचिव विजय जाधव,
छत्रपती शंभूराजे मंडळाचे मान्यवर पदाधिकारी आणि प्रमुख पंच
सूर्यकांत पाटील यांची उपस्थिती लाभली.
सोबतचे छायाचित्र: विजेते खेळाडू – डावीकडून विकास धारिया,
सागर वाघमारे.
Post a Comment
0 Comments