Type Here to Get Search Results !

झारखंड आणि पंजाब एफसी ठरले ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप फुटबॉल २०२५ चे विजेते रोमांचक अंतिम सामन्यांनंतर मुलींच्या गटात झारखंड, तर मुलांच्या गटात पंजाब एफसीचा झंझावात


झारखंड आणि पंजाब एफसी ठरले ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप फुटबॉल २०२५ चे विजेते

रोमांचक अंतिम सामन्यांनंतर मुलींच्या गटात झारखंड,

तर मुलांच्या गटात पंजाब एफसीचा झंझावात

 

गोवा : रायया स्पोर्ट्स ग्राउंडवर झालेल्या ड्रीम स्पोर्ट्स चॅम्पियनशिप फुटबॉल २०२५ च्या अंतिम फेरीत झारखंड एफए आणि पंजाब एफसीने जबरदस्त कामगिरी करत विजेतेपद पटकावले. देशभरातील सर्वोत्तम युवा खेळाडूंनी यात आपली चमक दाखवली.

 

मुलींच्या गटात झारखंडने ओडिशावर १-० असा विजय मिळवला. अनामिका सांगा हिने २०व्या मिनिटाला निर्णायक गोल करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. कर्णधार चंदनी कुमारीच्या नेतृत्वाखालील संघाचा बचावभिंत अखेरपर्यंत भक्कम राहिला.

 

मुलांच्या गटात पंजाब एफसीने मोहन बागान सुपर जायंट्सवर २-० ने मात करत विजेतेपद कायम राखले. सुभम गुरुंग (१०वा मिनिट) आणि आशिष लोहार (६४वा मिनिट) यांच्या गोलमुळे पंजाबने सहज विजय मिळवला. कर्णधार अनिकेत यादवने संघाच्या अपराजित मोहिमेचे श्रेय एकतेला दिले.

 

कार्यक्रमास बायचुंग भूटिया, सुब्रत पाल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. भूटिया यांनी स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय फुटबॉलच्या भविष्यातील आशा व्यक्त केल्या.

पहिल्या आवृत्तीत १७ खेळाडूंनी U-17 राष्ट्रीय शिबिरात स्थान मिळवले होते, जे या स्पर्धेच्या दर्जा आणि प्रभावाचे प्रतिबिंब आहे.


Post a Comment

0 Comments