१० वी मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट लीग
ठाणे मराठाजची द्वैती झळाळी – मुंबई पोलिसांवर सनसनाटी विजय
विराज व भूषणची दमदार कामगिरी
मुंबई : ठाणे मराठाज संघाने १० वी मित्सुई शोजी टी-२०
क्रिकेट लीगमध्ये दणदणीत कामगिरी करत सलग दोन सामने जिंकत स्पर्धेवर आपली छाप
उमटवली आहे.
सकाळच्या सत्रात, गतविजेते मुंबई पोलीस सिटी रायडर्स
यांना पराभवाचा धक्का देताना ठाणे मराठाज संघाने केवळ ९
षटकांत ३ बाद ९९ धावा करत ७ विकेट्सनी दणक्यात विजय मिळवला. विजयाचा नायक ठरला विराज जाधव, ज्याने २८ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह झंझावाती
५४ धावा करत संघाचा विजय निश्चित केला.
तत्पूर्वी, मुंबई पोलिसांचा डाव केवळ ९७ धावांत (९ बाद,
२० षटकांत)
आटोपला. ठाण्याच्या आतिफ अत्तारवाला (१७/२) आणि अक्षय
गायकवाड (२२/२) यांच्या अचूक माऱ्यामुळे पोलिसांचा फळी उधळली.
भूषण तळवडेकरच्या नाबाद ७० धावांनी घाटकोपर जेट्सवर मात
दुपारच्या सत्रात, ठाणे मराठाज संघाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत
घाटकोपर जेट्स संघावर ४ विकेट्सनी
विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करत घाटकोपर जेट्सने १५० धावांचे आव्हान
दिले. सिद्धार्थ आकरे (३३), सिद्दीद तिवारी (२८), सौरभ सिंग (२०) यांनी संघाच्या धावसंख्येत भर घातली.
परंतु भूषण तळवडेकर (नाबाद ७०) आणि अमन मणियार (नाबाद १२) यांनी अडचणीतून संघाला बाहेर
काढत ५८ धावांची अटळ भागीदारी करत सहज विजय मिळवून दिला.
अंकित यादव (२/२१) आणि मॅक्सवेल स्वामीनारायण (२/१९) यांची
भेदक गोलंदाजीही ठळक ठरली.
सामनावीर पुरस्कार विजेते :
मुंबई पोलिस विरुद्ध ठाणे मराठाज: विराज जाधव (५४ धावा)
घाटकोपर जेट्स विरुद्ध ठाणे मराठाज:
भूषण तळवडेकर (नाबाद ७०)
संक्षिप्त धावफलक :
मुंबई पोलीस सिटी रायडर्स – ९७/९ (२० षट.), (धर्मराज बगारे १८, रोनित घोसाळे १७; आतिफ अत्तारवाला २/१७, अजिंक्य बेलोसे २/२२)
ठाणे मराठाज –
९९/३ (९ षट.), (विराज जाधव ५४, सिद्धांत अधटराव १७, यश साळुंखे नाबाद १६)
घाटकोपर जेट्स – १५०/७ (२० षट.), (सिद्धार्थ आकरे ३३, सिद्दीद तिवारी २८; अंकित यादव २/२१, मॅक्सवेल स्वामीनारायण २/१९)
ठाणे मराठाज –
१५४/६ (१८ षट.), (भूषण तळवडेकर नाबाद ७०, रिदय खांडके २८, अजित पेहलवान २०; दानित राऊत ३/२५, हिमांशू सिंग २/२४)
Post a Comment
0 Comments