५९वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा वाशीमध्ये!
मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र
कॅरम असोसिएशन व ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ५९व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे
भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा
१० ते १३ मे २०२५
दरम्यान नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन,
सिल्वर ज्युबिली हॉल
(एसी), सेक्टर
१-अ, एमजीएम
हॉस्पिटल जवळ, वाशी येथे रंगणार आहे.
सहा गटांत चुरस रंगणार
या चार दिवसीय कॅरम महोत्सवात खेळाडूंना खालील सहा
गटांमध्ये आपली कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे:
पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी (५० वर्षांवरील),
महिला वयस्कर एकेरी (५० वर्षांवरील), पुरुष
सांघिक गट, महिला सांघिक गट
नोंदणी प्रक्रिया सुरू
स्पर्धेतील सहभागासाठी इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा
संघटनेशी संपर्क साधून नोंदणी करावी. स्पर्धेचे प्रवेश अर्ज
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtracarromassociation)
उपलब्ध आहेत.
प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२५, संध्याकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान आहे. अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या कार्यालयात
— पारेख
महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेल मागे, राजा राणी चौकाजवळ, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे स्वीकारले जातील.
राज्य पंच परीक्षेची संधी
स्पर्धेच्या कालावधीत राज्य पंच परीक्षा घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपली नावे
२८ एप्रिलपूर्वी जिल्हा संघटनेच्या शिफारसीने अर्जासह पाठवावीत.
पंच परीक्षेसाठी अधिक माहितीसाठी ९९८७०४५४२९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Post a Comment
0 Comments