Type Here to Get Search Results !

वरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाची सुवर्ण महोत्सवी कबड्डी स्पर्धा अमर क्रीडा, श्री संस्कृती प्रतिष्ठान, शताब्दी स्पोर्ट्स उपांत्य फेरीत

 


वरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाची सुवर्ण महोत्सवी कबड्डी स्पर्धा

अमर क्रीडा, श्री संस्कृती प्रतिष्ठान, शताब्दी स्पोर्ट्स उपांत्य फेरीत


मुंबईवरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या द्वितीय श्रेणी (ब) गटाच्या कबड्डी स्पर्धेत अमर क्रीडा मंडळ, श्री संस्कृती प्रतिष्ठान आणि शताब्दी स्पोर्ट्स यांनी दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ओम् साईनाथ सेवा संघाला वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांनाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळाली आहे. उपांत्य फेरीच्या लढती पुढीलप्रमाणे ठरल्या आहेत : अमर मंडळ विरुद्ध श्री संस्कृती प्रतिष्ठान शताब्दी स्पोर्ट्स विरुद्ध ओम् साईनाथ सेवा मंडळ

 

अमर मंडळाचा थरारक विजय

वरळी स्पोर्ट्स क्लबच्या "स्व. यशवंत साळवी मॅट" क्रीडांगणावर "स्व. दीपक वेर्लेकर चषका"करिता झालेल्या सामन्यात, अमर मंडळाने श्री साई क्लबवर चकवा देत विजय मिळवला. पहिल्या सत्रात लोण देत १६-०५ अशी भक्कम आघाडी घेतलेल्या अमर मंडळाला, दुसऱ्या सत्रात श्री साई क्लबने जबरदस्त टक्कर दिली. लोण व दोन आक्रमक पकडीच्या जोरावर श्री साईने सामन्यात रंगत निर्माण केली, मात्र अखेर अमर मंडळाने निसटता विजय साकारला. यश येळमकरअनिकेत वारंग यांच्या संयमी चढाया आणि पकडीचा अचूक खेळ अमर मंडळाच्या विजयात निर्णायक ठरला. श्री साई क्लबकडून नितेश पाटील, तेजस गायकवाड, संदेश पाटील यांनी चांगली झुंज दिली पण ते अपुरे पडले.

 

संस्कृती प्रतिष्ठानची दमदार पुनरागमन

दुसऱ्या सामन्यात, श्री संस्कृती प्रतिष्ठानने आंबेवाडी मंडळाला २१-१५ अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. सामन्याच्या सुरुवातीला आंबेवाडीने ऋषिकेश शिंदेयश माचीवले यांच्या खेळीने ५-७ अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात संस्कृतीच्या विनायक यादव याने एका चढाईत ३ गडी टिपत सामना फिरवला. अमन राणा याच्या चढायांचा आणि रोशन राय याच्या पकडीच्या भक्कम खेळाचा संस्कृतीच्या विजयात मोठा वाटा होता.

 

शताब्दी स्पोर्ट्सची आगेकूच

शेवटच्या सामन्यात शताब्दी स्पोर्ट्सने विजय बजरंग संघाचा ३३-१८ असा सहज पाडाव केला. करण जैसवाल यांनी आक्रमक चढाया करत शताब्दीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विजय बजरंग संघाकडून दर्शन कांबळे यांनी चांगला खेळ केला, मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही.


Post a Comment

0 Comments