संकेत सावंतच्या नेतृत्वाखाली फेडरेशन चषकासाठी महाराष्ट्र
कबड्डी पुरुष संघ सज्ज
मुंबई, विदर्भाच्या
मातीत पुन्हा एकदा कबड्डीचा जयघोष घुमणार आहे! भारतीय कबड्डी महासंघाच्या
मान्यतेने व विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या आयोजनातून अमरावती येथे होणाऱ्या
"चौथ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धे"
साठी महाराष्ट्राचा पुरुष संघ जाहीर करण्यात आला असून, मुंबई शहराचा गर्व असलेला संकेत सावंत
याच्या खांद्यावर संघनायकाची धुरा सोपविण्यात आली आहे.
ही प्रतिष्ठेची स्पर्धा २ ते ५ मे २०२५ दरम्यान, संत गाडगेबाबा समाधी मंदिर मैदान,
अमरावती येथील आधुनिक मॅट मैदानावर रंगणार आहे. राष्ट्रीय
कबड्डी स्पर्धेत विशेष स्थान मिळवलेल्या केवळ आठ संघांनाच या स्पर्धेत संधी मिळते.
यंदा महाराष्ट्राचा महिला संघ अपात्र ठरल्याने त्यांना या स्पर्धेत सहभाग मिळालेला
नाही.
महाराष्ट्राच्या संघाने बारामती स्पोर्ट्स अकादमीत कठोर सराव सत्राद्वारे आपली तयारी केली आहे. दमदार आणि
अनुभवी खेळाडूंनी सजलेला हा संघ महाराष्ट्रासाठी गौरवाचे क्षण घडवेल,
अशी खात्री व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राचा फेडरेशन चषक कबड्डी पुरुष संघ: १) संकेत सावंत (संघनायक), २) बालाजी जाधव, ३) शंकर गदई, ४) तेजस पाटील, ५) अक्षय सूर्यवंशी, ६) मयूर कदम, ७) शिवम पठारे, ८)
सुरेश जाधव, ९) आदित्य शिंदे, १०)
प्रणय राणे, ११) अजित चौहान, १२)
आदित्य पोवार, १३) ऋषिकेश बनकर, १४)
जयेश महाजन, प्रशिक्षक: दादासो आवाड, व्यवस्थापक:
आयूब खान पठाण
स्पर्धेच्या तयारीपासून नेतृत्वापर्यंत सर्वच स्तरांवर
महाराष्ट्र संघ ठाम, आत्मविश्वासपूर्ण आणि विजयी दृष्टीकोन ठेवून सज्ज झाला आहे. अमरावतीच्या मॅटवर
महाराष्ट्राचा रणगर्जना कसा घडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!
Post a Comment
0 Comments