कोल्हापूर राज्य कॅरम स्पर्धा
अभिजित त्रिपनकर व केशर निर्गुण उपांत्य फेरीत दाखल!
शंभूराजे फ्रेंड्स सर्कल, कोल्हापूर यांच्या वतीने आणि आमदार सतेज पाटील यांच्या
वाढदिवसानिमित्त आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून,
पुरुष व महिला गटातील उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट होत आहे.
पुरुष एकेरी गटात पुण्याच्या अभिजीत त्रिपनकर याने सहखिलाडी अनिल मुंढे याच्यावर संघर्षमय लढतीत २५-११,
५-२५, २५-८ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक दिली. विशेष म्हणजे,
अभिजीतने तिसऱ्या सेटमध्ये व्हाईट स्लॅम करत उपस्थितांची मने जिंकली.
महिला एकेरी गटात सिंधुदुर्गच्या केशर निर्गुण हिने नामवंत खेळाडू समृद्धी घाडिगावकर (ठाणे) हिला ०-२५ ने पहिला सेट गमावूनही जबरदस्त पुनरागमन करत २५-१,
१८-१३ असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरी – उप उपांत्य फेरी निकाल:
सागर वाघमारे (पुणे) विजयी विरुद्ध संजय मणियार (मुंबई उपनगर)
– २५-१६,
१७-१४
पंकज पवार (ठाणे) विजयी विरुद्ध संजय मांडे (मुंबई) – २५-१८, १६-२५, २५-११
विकास धारिया (मुंबई) विजयी विरुद्ध प्रकाश गायकवाड (पुणे) – २१-११, १२-२३, २३-१०
महिला एकेरी – उप उपांत्य फेरी निकाल:
मधुरा देवळे (ठाणे) विजयी विरुद्ध रिंकी कुमारी (मुंबई) – २५-२२, १४-१२
आकांक्षा कदम (रत्नागिरी) विजयी विरुद्ध चैताली सुवारे (ठाणे) – २५-०, २५-१०
प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध शोभा कामत (कोल्हापूर) – २५-२, २५-८

Post a Comment
0 Comments