भांडुपमध्ये कबड्डीच्या जल्लोषाची तयारी !
'युवा चषक 2025' स्पर्धेची धडाकेबाज घोषणा
मुंबई : भांडुपच्या मातीत पुन्हा एकदा कबड्डीचा जल्लोष, तरुणाईचा उत्साह आणि खेळाडूंच्या दमदार खेळींचा थरार रंगणार आहे! युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतमाता महिला संघाच्या सहकार्याने,
युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल
संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 'युवा चषक 2025' जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. २ मे ते ४ मे या कालावधीत
पराग विद्यालय मैदान, भांडुप (पश्चिम) येथे स्पर्धेचे आयोजन केले आहे.
कबड्डी स्पर्धेची वैशिष्ट्ये
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेली अधिकृत जिल्हास्तरीय स्पर्धा. प्रथम
व द्वितीय श्रेणी पुरुष गटांचे सामने, राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग, ४
सर्वोत्तम संघांसाठी रोख रक्कम व आकर्षक चषके
विशेष पारितोषिके
या स्पर्धेत सर्वोत्तम चढाईपटू, सर्वोत्तम पकडपटू, शिस्तबद्ध
संघ चषक व पब्लिक हिरो चषक — प्रेक्षकांच्या पसंतीचा संघ! अशी पारितोषिके दिली
जाणार आहेत.
आयोजक मंडळींचा उत्साह
या स्पर्धेबाबत आयोजक सुनील डिसूझा व संकेत भेगडे यांनी माहिती दिली की, "भांडुपमधील हा युवा चषक म्हणजे युवा खेळाडूंना संधी,
स्टॅमिना आणि
स्पर्धेची स्फूर्ती देणारा मंच ठरणार आहे."
स्पर्धेची अधिक माहिती हवी असल्यास शैलेश जागडे – 99202 90520 यांच्याशी संपर्क साधावा.
कबड्डीचा रंग, तरुणाईचा संग – भांडुपमध्ये देऊया खेळाडूंच्या जोशाला सलाम!

Post a Comment
0 Comments