शिवछत्रपती पुरस्कारविजेत्या सुवर्णा बारटक्के-पालव यांचा नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इंडिया पुरस्काराने गौरव
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक
पाऊल, २५
महिलांना सन्मान; महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भव्य कार्यक्रम
मुंबई : माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आणि शिवछत्रपती
पुरस्कार विजेत्या सुवर्णा बारटक्के-पालव यांना नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इंडिया पुरस्काराने गौरवण्यात आले. व्हॅलीयंट फेम आयकॉन आणि जिल्हा
सैनिक वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एका भव्य सोहळ्यात
त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य
साधून मुंबईत पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणासाठी
उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. या
महिलांमध्ये ठाण्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी असलेल्या सुवर्णा पालव यांचा समावेश
होता.
हा पुरस्कार माजी आमदार यामिनी जाधव यांच्या हस्ते प्रदान
करण्यात आला. सुवर्णा पालव या २०१२च्या कबड्डी विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा
भाग होत्या. तसेच त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व आणि
नेतृत्व केले आहे. त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील झपाटलेल्या योगदानाला आणि समाजातील
महिला सक्षमीकरणातील भूमिकेला हा पुरस्कार समर्पित करण्यात आला आहे.
सुवर्णा पालव यांच्या या सन्मानामुळे राज्यातील
क्रीडापटूंना नवे प्रेरणास्त्रोत मिळाले असून, त्यांच्या यशाचा आलेख नव्या पिढीसाठी आदर्श ठरतो आहे.

Post a Comment
0 Comments