१० वी मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट स्पर्धा
अंतिम लढतीला जोरदार सुरुवात!
आमदार भाई जगताप यांच्या हस्ते नाणेफेक;
शिवाजी पार्क
वॉरियर्सचा मुंबई पोलीस सिटी रायडर्सला फलंदाजीच आमंत्रण
मुंबई : क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या १० व्या
मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला पोलीस जिमखाना मैदानावर
थाटात सुरुवात झाली. नाणेफेकीचा मान आमदार भाई जगताप यांच्या हस्ते पार पडला आणि
या रोमांचक लढतीचा अधिकृत शुभारंभ झाला.
या वेळी कार्यक्रमाचे संयोजक ज्वाला सिंग, *एम.सी.ए.*चे प्रतिनिधी अभय हडप, मुंबई सिनियर निवड समितीचे चेअरमन संजय पाटील
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवाजी पार्क वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी
मुंबई पोलीस सिटी रायडर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
या स्पर्धेत दोन्ही संघांनी प्रभावी फलंदाजी आणि टोकदार
गोलंदाजी सादर करत अंतिम फेरीत आपली जागा पक्की केली आहे. तब्बल
२.५ लाखांची बक्षीस रक्कम आणि आकर्षक ट्रॉफीवर कोणते नाव कोरले जाणार,
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या थरारक अंतिम लढतीचा साक्षीदार होण्याची संधी चाहत्यांना
मिळाली असून, मैदानावर
जोश,
जिद्द आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
फोटो ओळी :
आमदार भाई जगताप १० व्या मित्सुई शोजी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम
सामन्याची नाणेफेक करताना. सोबत ज्वाला सिंग, अभय हडप आणि इतर मान्यवर.
सामन्यापूर्वी खेळाडूंची ओळख करून घेताना
आमदार भाई जगताप आणि संयोजक ज्वाला सिंग.


Post a Comment
0 Comments