अडसूळ ट्रस्ट शालेय सुपर लीग कॅरमला दमदार सुरुवात!
सिबिईयु वॉरियर्स,
मोहिते फायटर्स,
एमडीसी ज्वेलर्स आणि
आचरेकर फायटर्स संघांची पहिल्या फेरीत विजयी घोडदौड
मुंबई : महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे
औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अडसूळ ट्रस्ट शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेला
दमदार आणि उत्साही सुरुवात झाली. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने होत
असलेल्या या विनाशुल्क स्पर्धेत सिबिईयु वॉरियर्स, गोविंदराव मोहिते फायटर्स, एमडीसी ज्वेलर्स आणि सुरेश आचरेकर फायटर्स या संघांनी
सलामीचे सामने जिंकत स्पर्धेवर पहिल्याच दिवशी आपली मोहोर उमटवली.
दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहात रंगलेल्या या स्पर्धेचे भव्य उद्घाटन माजी केंद्रीय अर्थ
राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, प्रदीप पाटील, प्रमोद पार्टे आणि जनार्दन मोरे यांच्या उपस्थितीत पार पडले.
सिबिईयु वॉरियर्सने घोष फेअर प्ले संघावर २-१ असा विजय
मिळवताना प्रसाद माने व सारा
देवन यांनी
आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. मोहिते फायटर्सच्या पुष्कर गोळे,
युग पडिया आणि मंदार पालकर या त्रिकुटाने अभिजित
चॅम्पियन्सला सरळ ३-० असा दणका दिला.
एमडीसी ज्वेलर्स आणि आनंदराव प्लॅटिनम यांच्यात झालेल्या
अटीतटीच्या लढतीत स्वरा मोहिरे व वेदिका
पोमेंडकर यांच्या प्रभावी खेळीने एमडीसीने २-१ असा विजय मिळवला.
त्याचप्रमाणे, अंतिम सामन्यात राष्ट्रीय खेळाडू तनया दळवी हिने प्रेक्षा जैनवर २५-१ अशी मात करत सुरेश आचरेकर
फायटर्सला विजयी मुकुट मिळवून दिला.
स्पर्धेचे पंच म्हणून चंद्रकांत करंगुटकर, सचिन शिंदे, संतोष जाधव, अविनाश महाडिक आणि प्रॉमिस सैतवडेकर आपले कार्य बजावत आहेत.
ही स्पर्धा नवे खेळाडू घडविणारी आणि शालेय पातळीवर कॅरम
खेळाला बळ देणारी ठरते आहे, हे निश्चित!

Post a Comment
0 Comments