Type Here to Get Search Results !

भारतीय महिला बेसबॉल संघाचा थायलंडमध्ये झंझावात! आशिया कप क्वालिफायरमध्ये दमदार कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई


 

भारतीय महिला बेसबॉल संघाचा थायलंडमध्ये झंझावात! आशिया कप क्वालिफायरमध्ये दमदार कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई

 

भारताच्या महिला बेसबॉल संघाने थायलंडच्या बँकॉक शहरात २३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२५ या कालावधीत झालेल्या चौथ्या आशिया कप क्वालिफायर स्पर्धेत झंझावाती कामगिरी करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. यासह भारताने येत्या २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ४थ्या आशिया कप स्पर्धेसाठी अधिकृत पात्रता मिळवली आहे.

 

भारतीय संघाची नेतृत्वभारी महाराष्ट्राच्या सुपुत्रीवर!

या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व महाराष्ट्राच्या रेश्मा पुणेकर हिने कुशलतेने सांभाळले. तिच्यासह ज्योती पवार विद्या गिरी ह्याही महाराष्ट्राच्या तिन्ही दमदार खेळाडूंचा या संघात समावेश होता. महाराष्ट्राच्या या तिकडीने मैदानावर असामान्य खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भर घातली.

 

रौप्य पदकासह ऐतिहासिक पात्रता

क्वालिफायरमध्ये भारतीय संघाने जबरदस्त संघर्ष करत अंतिम फेरी गाठली आणि त्यात रौप्य पदक पटकावत देशाचा झेंडा उंचावला. हे यश फक्त पदकापुरते मर्यादित न राहता, भारतासाठी ४थ्या आशिया कपसाठी अधिकृत प्रवेशद्वार ठरले.

 

शुभेच्छांचा वर्षाव

या अपूर्व यशाबद्दल अमॅच्युअर भारतीय बेसबॉल संघाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र बेसबॉल संघाचे सरचिटणीस श्री. राजेंद्र इखणकर यांनी संघाला आणि विशेषतः महाराष्ट्राच्या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

महिलांच्या हातून इतिहास घडतोय – बेसबॉलच्या मैदानावर भारताची चमक वाढतेय!

या रौप्यपदकासह भारताच्या महिला बेसबॉल संघाने फक्त यश नव्हे, तर आगामी आशिया कपसाठी नवे स्वप्न उराशी बाळगले आहे. २६ ऑक्टोबरला होणाऱ्या मुख्य स्पर्धेत आता सुवर्ण पदकासाठी भारत सज्ज!

Post a Comment

0 Comments