Type Here to Get Search Results !

पंकज अडवाणीच्या नेतृत्वाखाली एनएससीआय बॉल्कलाइन स्नूकर स्पर्धेला रंगतदार सुरुवात! अव्वल ३२ खेळाडूंमध्ये तीव्र चुरस, बुधवारपासून मुख्य फेरीला सुरवात


 

पंकज अडवाणीच्या नेतृत्वाखाली एनएससीआय बॉल्कलाइन स्नूकर स्पर्धेला रंगतदार सुरुवात!
अव्वल ३२ खेळाडूंमध्ये तीव्र चुरस, बुधवारपासून मुख्य फेरीला सुरवात

 

मुंबई : देशातील प्रतिष्ठेच्या आणि सर्वाधिक बक्षीस रकमेच्या चौथ्या एनएससीआय बॉल्कलाइन स्नूकर स्पर्धेची मुख्य फेरी आज, बुधवार, ७ मे २०२५ पासून मुंबईतील एनएससीआय डोम येथे भव्यदिव्य प्रारंभ होत आहे. ३२ लाख रुपयांच्या एकूण बक्षीस निधीसह आयोजित या अखिल भारतीय स्पर्धेत भारताचे स्नूकर सम्राट पंकज अडवाणी यांच्यासह देशभरातील ३२ अव्वल खेळाडूंमध्ये तीव्र लढत रंगणार आहे.

 

गतविजेता पंकज अडवाणी याला यंदा अव्वल सीडिंग मिळालेली असून, तो आपले अजिंक्यपद राखण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या स्पर्धकांमध्ये व्यावसायिक स्नूकरमध्ये यश मिळवत असलेले इशप्रीत चढ्ढा, आदित्य मेहता, कमल चावला, सौरव कोठारी, एस. श्रीकृष्ण, तसेच जागतिक स्नूकर टूरमध्ये भाग घेणारा क्रिश गुरबक्षनी आणि स्पर्श फेरवानी यांसारखे नामांकित खेळाडू आहेत, जे या स्पर्धेतील चुरस अधिकच रंगतदार बनवत आहेत.

 

स्पर्धेची पात्रता फेरी पार करत १६ खेळाडूंनी मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. येथून पुढील बाद फेरीतील सामने ‘बेस्ट ऑफ नाईन फ्रेम्स’ या स्वरूपात खेळवले जाणार आहेत.

 

प्रेक्षकांसाठी खुला प्रवेश असलेली ही स्पर्धा, उच्च दर्जाच्या खेळाचा थरार अनुभवण्याची पर्वणी ठरणार आहे. भारतातील स्नूकरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि नवोदितांसाठीही ही स्पर्धा प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments