मनीष स्मृती चषक राज्यस्तरीय पुरुष खो-खो स्पर्धा
नवमहाराष्ट्र संघ व यजमान विहंग
क्रीडा मंडळ अंतिम फेरीत लढणार
नवी मुंबई : ‘खेळाडूंच्या जोशात पेटलेले मैदान,
आणि आता अंतिम सामना
ठरणार निर्णायक!’ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने विहंग क्रीडा मंडळ
आयोजित मनीष
स्मृती चषक राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धेची अंतिम फेरी पुण्याच्या
नवमहाराष्ट्र संघ व यजमान विहंग क्रीडा मंडळ यांच्यात रंगणार आहे.
ही रंगतदार लढत ऐरोली येथील श्रीमती राधिका मेघे
विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
उपांत्य फेरीतील थरार:
नवमहाराष्ट्र संघ वि राणा प्रताप तरुण मंडळ
या स्पर्धेत उपांत्य फेरीत पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने
कुपवाड्याच्या राणा प्रताप तरुण मंडळाचा ११-१० असा एक डाव राखून एक गुणाने दणदणीत
पराभव केला. या सामन्यात नव महाराष्ट्राच्या राहुल मंडल (नाबाद २.२० मि. संरक्षण व
१ गुण),
सुयश गरगटे (१.३०, २.३० मि. संरक्षण), ऋषभ वाघ (२ मि. संरक्षण व १ गुण),
शिवराम शिंगाडे (२.२० मि. संरक्षण),
अथर्व ढाणे (१.१०, १.३० मि. संरक्षण), रुद्र थोपटे (४ गुण) यांच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर
विजयाची नोंद केली. तर पराभूत राणा प्रताप तरुण मंडळाच्या आयुष लाड व सौरभ घाडगे
(प्रत्येकी १.१० मि. संरक्षण व १ गुण), साहिल वालकर (१ मि. संरक्षण व २ गुण) यांच्याशिवाय इतर
कोणालाही उल्लेखनीय कामगिरी करता न आल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले
विहंग क्रीडा मंडळाने वि. शिर्सेकर्स महात्मा गांधी
स्पोर्ट्स अकॅडमी
दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान विहंग क्रीडा मंडळाने
शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीचा १२-१० असा ३.४० मि. राखून २ गुणांनी
विजय साजरा केला. विहांच्या गजानन शेंगा ळ (१.३०, २.४० मि. संरक्षण व ३ गुण), महेश शिंदे (१, ३ मि. संरक्षण), आकाश तोगरे (१.३०, १.५० मि. संरक्षण), आकाश कदम (३ गुण) यांनी विजयाची पायाभरणी केली. तर पराभूत
शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीच्या हर्षद हातणकर (१.४०,
२.३० मि. संरक्षण, २ गुण), निहार दुबळे (२.१० मि. संरक्षण व ३ गुण),
दीपक माधव, रामचंद्र झोरे, निखिल सोडये व प्रतिक देवरे ( प्रत्येकी १.१० मि. संरक्षण)
यांना आपली कामगिरी उंचावतांना आल्याने पराभवाचा सामना करावा लागला.
आता संपूर्ण खो-खो क्रीडाजगताची नजर अंतिम सामन्यावर आहे.
नवमहाराष्ट्रचा आक्रमक खेळ की विहंग मंडळाचा घरच्या मैदानावरील आत्मविश्वास – कोण
ठरणार विजेता?

Post a Comment
0 Comments