अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा २०२५
मडीसी ज्वेलर्स विजेते
एमडीसीच्या सार्थकच्या खेळीने स्पर्धेत धमाका!
मुंबई : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत एलआयसी
प्रायोजित, विनाशुल्क
अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धा
दादर-पश्चिम येथे जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत
राज्यख्यातीच्या खेळाडूंनी सजलेल्या एमडीसी ज्वेलर्स संघाने धमाकेदार खेळ करत अंतिम लढतीत बाजी मारली.
अंतिम सामन्यात थरारक लढत:
पहिल्याच सामन्यात एमडीसीच्या सार्थक केरकर याने राष्ट्रीय शालेय कॅरमपटू तनया दळवी हिचा २५-० असा नील गेमने धुव्वा उडवत संघाला आघाडी
मिळवून दिली. मात्र, प्रत्युत्तरादाखल जैतापूरच्या आर्यन राऊत याने वेदिका पोमेंडकरवर २५-० अशी मात करत सामना १-१ ने
बरोबरीत आणला. निर्णायक लढतीत अमेय जंगम याने अर्णव गावडेवर १७-११ अशी मात करत एमडीसी ज्वेलर्सला
अजिंक्यपदाचा मान मिळवून दिला.
तृतीय क्रमांकासाठी देखील जोरदार झुंज:
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व सिबिईयु वॉरियर्स यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची झाली. मयुरेश पवार आणि
प्रसाद माने यांनी अनुक्रमे प्रतिस्पर्ध्यांना नील गेम देत सामना बरोबरीत आणला.
अखेरच्या सामन्यात श्रीशान पालवणकर याने उमैर पठाणचा २५-५ असा पराभव करत आत्माराम मोरे
प्रतिष्ठानला तिसऱ्या क्रमांकावर विराजमान केले.
स्पर्धेतील ठळक संघ:
उपांत्यपूर्व विजेते: गोविंदराव मोहिते फायटर्स, आनंदराव अडसूळ प्लॅटिनम
इतर उल्लेखनीय संघ: अभिजित घोष फेअर प्ले, अविनाश नलावडे स्पोर्ट्स
पारितोषिक वितरण सोहळा:
या भव्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा
माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ,
कॅप्टन अभिजित अडसूळ, क्रीडापटू राजीव अडसूळ यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पंच मंडळींचे कुशल संचालन:
संतोष जाधव, सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर, अविनाश महाडिक, अर्जुन कालेकर, वेदांत महाडिक, ओमकार चव्हाण, प्रॉमिस सैतवडेकर यांनी स्पर्धेचे पंच म्हणून उत्कृष्ट
योगदान दिले.

Post a Comment
0 Comments