खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२५ : आकांक्षा म्हेत्रेला
सुवर्णाची झळाळी, सिद्धेश घोरपडेला रौप्याची साथ!
सायकलिंगमध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड,
सलग दुसऱ्या दिवशी
चमकदार कामगिरी
नवी दिल्ली – राजधानीतील यमुना वेलोड्रमवर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी
पुन्हा एकदा आपली सरशी सिद्ध केली. आकांक्षा म्हेत्रेने मुलींच्या २०० मी. स्प्रींट
सायकलिंगमध्ये सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचा झेंडा उंचावला,
तर सिद्धेश घोरपडेला मुलांच्या ३,००० मी. इंडिव्हिज्युअल पुरसुईट शर्यतीत रौप्यपदकावर समाधान
मानावे लागले.
सायकलिंग स्पर्धेतील हे महाराष्ट्राचे सलग दुसऱ्या दिवशीचे
यश ठरले.
आकांक्षाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत
केरळच्या अनाक्षीया थॉमसला मागे
टाकले, तर
झारखंडच्या सबिना कुमारीने कांस्यपदक मिळवले. मंगळवारीही आकांक्षाने दोन पदकांची
कमाई करून आपली लय दाखवली होती. बुधवारी सुवर्णपदक जिंकून तिने स्पर्धेतील आपली
छाप अधिक ठसठशीत केली.
दुसरीकडे, सिद्धेश घोरपडेला ३ मिनिटे ३७.७७८ सेकंद वेळेसह रौप्यपदक
मिळाले. मंगळवारी त्याने महाराष्ट्रासाठी सायकलिंगमधील पहिले सुवर्ण जिंकले होते.
मात्र,
बुधवारी राजस्थानच्या सिताराम बेनिवलने ३ मिनिटे ३६.६०७
सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकावर कब्जा केला.
या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या पदकांची घोडदौड अधिक गतिमान
झाली आहे. खेळाडूंमधील जिद्द, कौशल्य आणि सातत्यामुळे देशातील क्रीडा नकाशावर महाराष्ट्र भक्कम उभा आहे.

Post a Comment
0 Comments