ध्रुव सितवाला अंतिम फेरीत;
हरियाचा धुव्वा उडवत
सीसीआय बिलियर्ड्स क्लासिकमध्ये झंझावात कामगिरी
मुंबई : आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियन ध्रुव सितवाला याने शनिवारी सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जबरदस्त कामगिरी करत
ध्वज हरियाचा ४-० असा धुव्वा उडवत
अंतिम फेरीत प्रवेश केला.
विल्सन जोन्स हॉलमध्ये रंगलेल्या या सामन्यात
ध्रुव सितवालाच्या ब्रेक्सची
आतषबाजी पाहायला मिळाली. त्याने ६३, १२७, ११९,
५९ आणि नाबाद ७८ अशा प्रभावी ब्रेक्ससह विजयावर
शिक्कामोर्तब केलं. हरियाने चौथ्या फ्रेममध्ये ८१ चा प्रभावी ब्रेक घेतला तरी
सितवालाने त्याला पुनरागमनाची संधी दिली नाही.
उपांत्य फेरी निकाल:
ध्रुव सितवाला विजयी वि. ध्वज हरिया – ४-०, (१५०(६३)-४८, १५२ (१२७)-५३, १५० (११९)-४३, १५० (५९,७८)-१२८ (८१))*
उपांत्यपूर्व फेरीत ठळक विजय:
पंकज अडवाणी विजयी वि. सिद्धार्थ पारिख – ४-१, (१५१-१३०(६५), ४८-१५२(१३०), १५०(६९)-६०, १५२(९८,५०)-६, १५०(१५०)-२)
रायन राझमी विजयी वि. ऋषभ ठक्कर – ४-०, (१५३-३२, १५०(८५,६८)-६, १५१(९९)-२५, १५०(९४)-२९)
अंतिम लढत रंगणार
ध्रुव सितवाला आता अंतिम फेरीत पंकज अडवाणी किंवा रायन राझमीपैकी एका प्रतिस्पर्ध्याशी
सामना खेळणार आहे. गेल्या जुलैमध्ये रियाधमध्ये अडवाणीला हरवलेल्या विजयानंतर सितवालाच्या
आत्मविश्वासात भर पडली आहे.
स्पर्धेची अंतिम लढत केवळ विजेतेपदाचीच नव्हे तर
प्रतिष्ठेची चुरस ठरणार, हे निश्चित!
Post a Comment
0 Comments