Type Here to Get Search Results !

भोसले क्रिकेट अकादमीचा निसटता विजय; युग मस्कराचा धारदार मारा


भोसले क्रिकेट अकादमीचा निसटता विजय; युग मस्कराचा धारदार मारा

 

एमसीसी टॅलेंट सर्च (14 वर्षांखालील) क्रिकेट लीगमध्ये ३ धावांनी रोमांचक विजय; युग मस्करा ठरला सामनावीर

 

मुंबई : युग मस्करा आणि शार्दुल अनिल यांच्या तुफानी गोलंदाजीच्या जोरावर भोसले क्रिकेट अकादमीने एमसीसी टॅलेंट सर्च (१४ वर्षांखालील) मुलांच्या क्रिकेट लीगमध्ये शिव सेवा क्रिकेट क्लबवर ३ धावांनी रोमांचक विजय मिळवला. ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित ओव्हल मैदानावर हा सामना रंगला.

 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भोसले क्रिकेट अकादमीने ३७ षटकांत १२७ धावा केल्या. क्रिस्टियानो बुथेलो (३०) आणि विवेक यादव (३२) यांनी महत्त्वपूर्ण खेळी बजावली. शिव सेवा क्रिकेट क्लबकडून आहिल अली सय्यद (3/15), सर्वज्ञ यादव (3/19) आणि आरिश श्रीकांत (2/22) यांनी भेदक गोलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना रोखून धरले.

 

१३८ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या शिव सेवा क्रिकेट क्लबने ३०.४ षटकांत १२४ धावा करत झुंजार लढत दिली. सोहम मोकारीने ४९ चेंडूत ४८ धावांची झुंज दिली; पण इतर फलंदाजांना युग मस्करा (८-२-२८-३) आणि शार्दुल अनिल (३/२) यांच्या अचूक व घातक गोलंदाजीसमोर तग धरता आले नाही. उत्कृष्ट स्पेल टाकल्याबद्दल युग मस्करा याला सामनावीर पुरस्कार मिळाला.

 

संक्षिप्त धावफलक :

भोसले क्रिकेट अकादमी – ३७ षटकांत सर्वबाद १२७ (क्रिस्टियानो बुथेलो ३०(४३), विवेक यादव ३२(३१); आहिल अली सय्यद 3/15, सर्वज्ञ यादव 3/19, आरिश श्रीकांत 2/22). विरुध्द  शिव सेवा क्रिकेट क्लब – ३०.४ षटकांत सर्वबाद १२४ (सोहम मोकारी ४८(४९); शार्दुल अनिल 3/2, युग मस्करा 3/28).


निकाल : भोसले क्रिकेट अकादमी ३ धावांनी विजयी.


फोटो - सामनावीर : युग मस्करा (८-२-२८-३).


Post a Comment

0 Comments