कुमार – मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा
अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०२५-२६
शिवनेरी, ओम साईश्वर, आर्य सेना, वैभव स्पो. क्लब यांचा दमदार विजय
मुली व मुलांच्या गटात रोमांचक सामने; खेळाडूंच्या
उत्कृष्ट संरक्षण व गुणांसह प्रेक्षक मंत्रमुग्ध
मुंबई, (क्री. प्र.), मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने इन्स्पायर फाऊंडेशन
आयोजित आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुरस्कृत कुमार-मुली (ज्युनिअर)
जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे रंगतदार सामने केशवराव दाते
क्रीडांगण, आगाशे पथ,
दादर (प.) येथे झाली. ३० नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहेत. सुरवातीला
साखळी व नंतर बाद पद्धतीने सामने खेळवले जात आहेत.
शिवनेरी सेवा
मंडळ वि. ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर
मुलींच्या
सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरचा ९-४ (मध्यंतर ९-१)
असा एक डाव राखून ५ गुणांनी पराभव केला. शिवनेरीच्या सिद्धी शिंदे (७.४०
मि. संरक्षण), गार्गी काडगे (नाबाद ५.३० मि. संरक्षण व १ गुण), रिया
जावळे (२.१० मि. संरक्षण) व मुस्कान शेख (नाबाद १.२० मि. संरक्षण व १
गुण) तर पराभूत ओम समर्थच्या सृष्टी पाष्टे (५.५० मि. संरक्षण), अवनी
पाटील (१.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी कमालीचा खेळ करत प्रेक्षकांना
मंत्रमुग्ध केले.
ओम साईश्वर सेवा
मंडळ वि. श्री समर्थ व्या. मंदिर
मुलींच्या
दुसऱ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने श्री समर्थ व्या. मंदिरचा ५-४ (मध्यंतर ५-२)
असा एक डाव राखून १ गुणाने सहज पराभव केला. ओम साईश्वरच्या यशस्वी कदम (५, ४ मि. संरक्षण व २ गुण), निर्मिती
परब (२.३०, ३.३० मि. संरक्षण), कादंबरी तेरवणकर
(दोन्ही डावात नाबाद १.३०, १.३० मि. संरक्षण व २ गुण), यांनी
तर पराभूत श्री समर्थच्या तन्वी मोरे (३ मि. संरक्षण), सोनम शेलार
(२.४० मि. संरक्षण व २ गुण), आस्था महाडिक (१, मि. संरक्षण व
१ गुण) यांनी जोरदार खेळ केला.
आर्य सेना वि. वैभव
स्पो. क्लब
मुलींच्या तिसऱ्या
सामन्यात आर्य सेनाने वैभव स्पो. क्लबवर ६-५ (मध्यंतर ४-३)असे ५.३० मि. राखून १
गुणाने विजय संपादन केला. आर्य सेनेच्या आरुषी पवार (३.४०, नाबाद २.४० मि.
संरक्षण व १ गुण), सायली जाधव (१.२०, ३.५० मि. संरक्षण व २ गुण), अन्वी काकडे (१.३०, २.३० मि.
संरक्षण व १ गुण), अनुष्का भिडे (नाबाद २.३० मि. संरक्षण) यांनी आपल्या
संघाचा विजय पक्का केला. तर पराभूत वैभवच्या सृष्टी शेडगे (४.४० मि.
संरक्षण व १ गुण), दर्शिता शर्मा (१.४०, १ मि.
संरक्षण व १ गुण), मुग्धा देवळेकर (१.२० मि. संरक्षण व २ गुण) व पूर्वा
महाडिक (१.५० मि. संरक्षण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
वैभव स्पो. क्लब वि. अमरहिंद मंडळ
मुलांच्या
सामन्यात वैभव स्पो. क्लबने अमरहिंद मंडळावर ९-८ (मध्यंतर ८-४) असा ८.१० मि. राखून
१ गुणाने विजय मिळवला. वैभवच्या निहाल पंडित (नाबाद ३.३० मि. संरक्षण व ५
गुण), निमेश चौगुले (नाबाद २ मि. संरक्षण व ४ गुण), राहुल नेवरेकर
(१.२०, २ मि. संरक्षण), यश जाधव
(२.२० मि. संरक्षण) यांनी तर पराभूत अमरहिंदच्या यश बामणे (१.५० मि.
संरक्षण व ३ गुण), श्रेयश मूळम व शौर्य राहटे (प्रत्येकी १.५० मि.
संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.
सरस्वती स्पो.
क्लब (अ) वि. ओम समर्थ भारत
व्यायाम मंदिर
मुलांच्या दुसऱ्या
सामन्यात सरस्वती स्पो. क्लब (अ) ने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरवर ११-६ (मध्यंतर ११-२)
असा एक डाव राखून ५ गुणांनी धुव्वा उडवला. सरस्वतीच्या रोहन कांबळे (नाबाद
३.५० मि. संरक्षण व ३ गुण), समर्थ उपशेटे (३.१० मि. संरक्षण), ओम नरवरे
(२.२० मि. संरक्षण व १ गुण), ओमकार, मनीष, सोहम (प्रत्येकी २ मि. संरक्षण)
यांनी विजय सहज केला तर पराभूत साई गुरव (२.३० मि. संरक्षण व २ गुण), रुद्रसिंग
चवान (२ मि. संरक्षण), यांनी जोरदार लढत दिली.
ओम साईश्वर सेवा
मंडळ वि. श्री समर्थ व्या. मंदिर
मुलांच्या तिसऱ्या
सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने श्री समर्थ व्या. मंदिरचा ११-५ (मध्यंतर ११-२) असा एक डाव राखून ६ गुणांनी सहज धुव्वा
उडवला. ओम साईश्वरच्या निषाद ताम्हणेकर (४.२० मि. संरक्षण व १ गुण), अधिरात
गुरव (२.४० मि. संरक्षण व २ गुण), सुजल शिंत्रे (२.१० मि. संरक्षण व ३
गुण) यांनी विजयात धमाकेदार कामगिरी केली तर पराभूत श्री समर्थच्या मुफिद
लांजेकर (२ मि. संरक्षण), साईश गोळेकर (१.४० मि. संरक्षण व १ गुण)
यांची लढत अपुरी पडली.
विद्यार्थी
क्रीडा केंद्र (अ) वि. विद्यार्थी क्रीडा केंद्र (ब)
मुलांच्या चौथ्या
सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्र (अ)ने विद्यार्थी क्रीडा केंद्र (ब) चा ९-६
(मध्यंतर ९-३) असा एक डाव राखून ३ गुणांनी
सहज पराभव केला. विद्यार्थी (अ) च्या प्रसाद घाडीगावंकर (४ मि. संरक्षण व ३
गुण), सुबोध पाटील (४ मि. संरक्षण), मनन वाल्मिकी (३ मि. संरक्षण)
यांनी तर पराभूत विद्यार्थी (ब) च्या अनमोल वाल्मिकी, आयुष यादव व वेद
बोबाडे यांनी चांगली कामगिरी केली.

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
Post a Comment
0 Comments