उत्कर्षचा ‘ब्लास्टिंग’ खेळ! आर.डी. ब्लास्टर्सचा ९२
धावांनी दणदणीत विजय
नाबाद ९५ धावांची उत्कर्ष राऊतची आतषबाजी;
गोलंदाजांचा धारदार
मारा
मुंबई : सूर्यवंशी क्षत्रिय टी-ट्वेंटी क्रिकेट लीग
२०२५ मध्ये आर.डी. ब्लास्टर्स सीसीच्या वनडाऊन फलंदाज उत्कर्ष राऊतने वादळी
फटकेबाजी करत ५० चेंडूत नाबाद ९५ धावा झळकावत स्पर्धेची दिमाखदार सुरुवात केली.
त्याच्या भेदक खेळीच्या जोरावर ब्लास्टर्सने स्वराज्य इलेव्हन सीसीवर तब्बल
९२ धावांनी
ऐतिहासिक विजय मिळवला.
मुंबई पोलीस जिमखाना येथे झालेल्या या सामन्यात प्रथम
फलंदाजी करताना ब्लास्टर्सने २० षटकांत ३ बाद १८७ धावांचा डोंगर रचला. उत्कर्षने
१० चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करत स्वराज्य गोलंदाजांना अक्षरशः रसातळाला नेले.
त्याला सलामीवीर भाविक राऊतने (३६ धावा) ठोस साथ दिली.
प्रत्युत्तरात, स्वराज्य इलेव्हन सीसीची सुरुवातच ढासळली. ब्लास्टर्सच्या
गोलंदाजांनी अचूक लाइन-लेंथ ठेवत प्रतिस्पर्ध्यांना १७.३ षटकांत केवळ
९० धावांत
गारद केले. ओंकार पाटील (२५) आणि हृदयांशू पाटील (२२) वगळता
इतर कोणालाच मोठी खेळी करता आली नाही. ब्लास्टर्सकडून हार्दिक राऊत,
समीर पाटील आणि भाविक राऊत यांनी प्रत्येकी २ बळी घेत विजय
पक्का केला.
संक्षिप्त धावफलक :
आर.डी. ब्लास्टर्स सीसी – २० षटकांत ३ बाद १८७ (उत्कर्ष राऊत ९५* (५० चेंडू, १०x४,
४x६),
भाविक राऊत ३६; वेद पाटील २/२१)
वि. स्वराज्य इलेव्हन सीसी
– १७.३ षटकांत सर्वबाद ९० (ओंकार पाटील २५, हृदयांशू पाटील २२; हार्दिक राऊत २/१४, समीर पाटील २/२०, भाविक राऊत २/२४)
निकाल : आर.डी. ब्लास्टर्स सीसी ९२ धावांनी विजयी.
.jpg)
Post a Comment
0 Comments