खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत फिडे गुणांकित आदित्य बारटक्के
विजयाचा बादशहा!
एलआयसी-आयडियल चषकावर आदित्यची मुहर;
निर्णायक फेरीत
अपराजित खेळीने सर्वांना मागे टाकले
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे बालदिनानिमित्त
आयोजित आणि एलआयसी पुरस्कृत एलआयसी–आयडियल चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत
फिडे गुणांकित आंतरराष्ट्रीय
बुद्धिबळपटू आदित्य बारटक्केने सर्वाधिक ६ गुण नोंदवत अजिंक्यपद पटकावले. सातव्या निर्णायक फेरीत पहिल्या
पटावर अरेना फिडे मास्टर हृदय मणियार (५.५ गुण) याच्याविरुद्ध आदित्यने अचूक, स्थिर आणि आक्रमक खेळाची छाप पाडली. हृदयने सुरुवातीला
जोशात खेळ दिला, पण
आदित्यच्या अनुभवापुढे १९व्या चालीला सामना बरोबरीत सोडावा लागला.
दुसऱ्या पटावर अजिंक्यपदाचे दावेदार ९ वर्षीय फिडे गुणांकित
कथित शेलार
आणि अनिरुद्ध सुब्रमण्यन यांनी देखील २२व्या चालीला सामना अनिर्णित ठेवला. त्याचा
लाभ घेत आदित्यने विजेतेपदासोबत रोख पुरस्कार आणि प्रतिष्ठेचा
एलआयसी–आयडियल चषक
आपल्या नावे केला.
मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि आरएमएमएसच्या
सहकार्याने झालेल्या या स्पर्धेत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड येथेून आलेल्या आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ३३ खेळाडूंना धरून एकूण ६४
स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत खालीलप्रमाणे विजेते निश्चित
झाले :
स्पर्धेतील अनुक्रमे विजेते :
आदित्य बारटक्के – ६ गुण (प्रथम), तन्मय
मोरे – ५.५ गुण (द्वितीय), व्ही.
प्रिजेश – ५.५ गुण (तृतीय), अनिरुद्ध सुब्रमण्यन – ५.५ गुण
(चौथा), हृदय मणियार – ५.५ गुण (पाचवा), कथित शेलार – ५.५ गुण (सहावा), ओम देवरुखकर – ५ गुण
(सातवा), यश कापडी – ५ गुण (आठवा), रियान
पटनी – ५ गुण (नववा), अरविंद चंद्रकर – ५ गुण (दहावा)
गौरव समारंभ :
विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात
आले. त्यावेळी फिडे इंस्ट्रक्टर व प्रशिक्षक राजाबाबू गजेंगी, आयडियलचे सल्लागार विलास डांगे, क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती
पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.
खुल्या आणि शालेय गटांमध्ये मिळून एकूण
२७ रोख पारितोषिके आणि १२९ चषक
वाटप करण्यात आले.

Post a Comment
0 Comments