Type Here to Get Search Results !

आराध्य तेलीची चमकदार अर्धशतकी खेळी; शिवसेवा सीसीचा ८ विकेटांनी दणदणीत विजय एमसीसी टॅलेंट सर्च १४ वर्षांखालील क्रिकेट लीगमध्ये आराध्यचा तूफानी फॉर्म इतर सामन्यांत आयुष सुतार, युग मस्कारा ठरले विजयी शिलेदार


 

आराध्य तेलीची चमकदार अर्धशतकी खेळी; शिवसेवा सीसीचा ८ विकेटांनी दणदणीत विजय


एमसीसी टॅलेंट सर्च १४ वर्षांखालील क्रिकेट लीगमध्ये आराध्यचा तूफानी फॉर्म

इतर सामन्यांत आयुष सुतार, युग मस्कारा ठरले विजयी शिलेदार

 

मुंबई, १८ नोव्हेंबर : ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या एमसीसी टॅलेंट सर्च १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट लीगमध्ये शिवसेवा क्रिकेट क्लबच्या आराध्य तेलीने अचूक आणि संयमी फटकेबाजीची उधळण करत आपल्या संघाला ८ विकेटांनी प्रभावी विजय मिळवून दिला. ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित या स्पर्धेत आराध्यने ८१ चेंडूत नाबाद ७७ धावा करत सामन्यात निर्णायक भूमिका बजावली आणि सामनावीर म्हणून गौरव मिळवला.

 

तत्पूर्वी, शिवसेवाच्या गोलंदाजांनी दक्ष कदम, आहिल अली सय्यद आणि श्रवग्य यादव (प्रत्येकी २ विकेट) यांच्या जोरदार माऱ्यावर एमसीसी सांताक्रूझचा डाव ४० षटकांत १६४ धावांवर रोखला. या आव्हानाचा पाठलाग करताना शिवसेवाने केवळ २४.४ षटकांत २ बाद १६५ धावा करत सहज विजय मिळवला. आराध्यला अरविन अंबाती (४४) याची उत्तम साथ लाभली.

 

अन्य सामने :

एमसीसी ठाणेचा ५ विकेटांनी विजय

आयुष सुतारने अष्टपैलू खेळी (६१ व २/१४)* आणि शार्दुल जोशीने ४/२२ च्या भेदक स्पेलने कॉम्रेड क्रिकेट क्लबवर मात केली. कॉम्रेडचा डाव १३२ धावांवर संपला, तर ठाण्याने ३७.१ षटकांत लक्ष्य पूर्ण केले.

 

भोसले क्रिकेट क्लबचा २ विकेटांनी रोमांचक विजय

स्पायडर क्रिकेट अकादमीचा डाव १२४ धावांत समेटताना युग मस्कारा (८-४-१५-३) याने प्रभावी गोलंदाजी केली. भोसले क्लबने चुरशीच्या लढतीत २ विकेट राखून विजय मिळवला.

 

संक्षिप्त धावफलक :

स्पायडर क्रिकेट अकादमी१२४ सर्वबाद (यशवर्धन नायके ३४; तनिष्क भोसले ३/३२, युग मस्करा ३/१५) विरुध्द भोसले क्रिकेट क्लब ८ बाद १२८ (कविश चौधरी २५, प्रशम सेठ २०; आशीष चौरसिया २/२०)

निकाल : भोसले सीसी २ विकेटांनी विजयी        सामनावीर : युग मस्करा

 

कॉम्रेड क्रिकेट क्लब१३२ सर्वबाद (यश कुंदर २१; शार्दुल जोशी ४/२२, आयुष सुतार २/१४) विरुध्द एमसीसी ठाणे५ बाद १३३ (आयुष सुतार ६१*, विवान गुर्जर २४; पवन पुजारा २/२८)

निकाल : एमसीसी ठाणे ५ विकेटांनी विजयी      सामनावीर : आयुष सुतार

 

एमसीसी, सांताक्रूझ१६४ सर्वबाद (दैविक शाहू ४२, सम्मुख पवार ३०, धार्या गुप्ता ३०; दक्ष कदम २/१८, आहिल अली सय्यद २/२०, श्रवग्य यादव २/१८) विरुध्द शिवसेवा क्रिकेट क्लब२ बाद १६५ (आराध्य तेली ७७* (८१), अरविन अंबाती ४४; दीपांतशु शोम १/२३)
निकाल : शिवसेवा सीसी ८ विकेटांनी विजयी     सामनावीर : आराध्य तेली

 

फोटो : आराध्य तेली – नाबाद ७७ (८१ चेंडू)


Post a Comment

0 Comments