Type Here to Get Search Results !

१,७५० पेक्षा जास्त स्कॉट्स मारून श्री गणेश आखाड्याची कोमल पटेल ठरली विजेती

 


,७५० पेक्षा जास्त स्कॉट्स मारून श्री गणेश आखाड्याची कोमल पटेल ठरली विजेती

इंटरनॅशनल हेल्थ, स्पोर्ट्स आणि फिटनेस फेस्टिवलमध्ये पुरुषांनाही मागे टाकत कोमलची दमदार कामगिरी

 

मुंबई : मीरा-भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याची महिला पैलवान कोमल पटेल हिने आपल्या अद्वितीय शारीरिक क्षमता आणि प्रबळ मानसिक ताकदीच्या जोरावर इतिहास रचला आहे. गोरेगाव पूर्व येथील नेस्को, बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आय.एच.एफ.एफ. (International Health, Sports & Fitness Festival) यांच्या वतीने आयोजित स्पर्धेत तिने ,७५० पेक्षा अधिक स्कॉट्स मारत अव्वल क्रमांक पटकावला.

 

या स्पर्धेला प्युरिटेओ न्यूट्रिशन कंपनीचे सहकार्य होते. विविध व्यायाम प्रकारातील विजेत्यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेत कोमल ही एकमेव महिला स्पर्धक होती आणि तिने सर्व पुरुष स्पर्धकांनाही मागे टाकून विजेतेपदाची शान मिळवली.

 

स्पर्धेच्या सुरुवातीला ५०० स्कॉट्सपर्यंत पोहोचताच अनेक स्पर्धक बाद होत गेले; ,१०० स्कॉट्सपर्यंत पोहोचल्यावर शेवटी फक्त तिघेच स्पर्धेत टिकून होते, आणि अखेर कोमलने दमदार खेळी करत सुवर्णक्षण हस्तगत केले. स्पर्धेदरम्यान कुस्ती प्रशिक्षक वैभव माने आणि सुशांत जाधव यांनी तिचे मनोबल सतत उंचावले.

 

कोमल पटेल गेली चार वर्षे वस्ताद वसंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. आंतर- कॉलेज कुस्ती स्पर्धेत तिने अलीकडेच सुवर्ण पदक मिळवून मुंबई विद्यापीठाच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती संघात स्थान निश्चित केले आहे. ठाणे जिल्हा स्तरावर ती अव्वल खेळाडू आहे. तसेच राष्ट्रीय आणि राज्य कराटे स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळवले आहे.

 

कोमलच्या यशामागे संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे. तिचे वडील रिक्षाचालक असून घरची आर्थिक परिस्थिती बेताची, तरीही जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिने मोठे स्वप्न साकारण्याचा मार्ग खुला केला आहे. सध्या कोमल अभिनव कॉलेजच्या कला शाखेत पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे, पुढेही आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवण्याचे तिचे ध्येय आहे.

 


Post a Comment

0 Comments