Type Here to Get Search Results !

दादरमध्ये खो-खोचा महा संग्राम सुरू – ओम साईश्वर, वैभव स्पो. क्लब व शिवनेरीची विजयी सलामी


कुमार – मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०२५-२६

दादरमध्ये खो-खोचा महा संग्राम सुरू – ओम साईश्वर, वैभव स्पो. क्लब व शिवनेरीची विजयी सलामी


इन्स्पायर फाऊंडेशनतर्फे व मनसे पुरस्कृत कुमार-मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद

उत्कंठावर्धक सामन्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध


मुंबई, (क्री. प्र.), मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने इन्स्पायर फाऊंडेशन आयोजित आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत कुमार-मुली (ज्युनिअर) जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेची रंगतदार सुरुवात केशवराव दाते क्रीडांगण, आगाशे पथ, दादर (प.) येथे झाली. ३० नोव्हेंबरपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष व मनसे मुंबई शहर उपशहराध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनप्रसंगी इन्स्पायर फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य गंधेकर, प्र.कार्यवाह साकेत जेस्ते, खजिनदार पवन घाग, मुंबई खो-खो संघटनेचे प्र.कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, श्रीकांत गायकवाड, पराग आंबेकर, गुरुदत्त शिंदे, निलेश सावंत, निकेत राऊत यांच्यासह पदाधिकारी, खो-खो प्रेमी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


सुरुवातीपासूनच ‘धुव्वा’ उडवत सामना

पहिल्याच सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने सरस्वती कन्या संघाचा ११-७ (मध्यंतर ११-२) असा एक डाव ४ गुणांनी धुव्वा उडवत विजय मिळवला. ओम साईश्वरच्या कादंबरी तेरवणकर (७.१०, नाबाद १.३० मि. संरक्षण १ गुण), आर्या आचरेकर (३ मि. संरक्षण २ गुण), यशस्वी कदम (नाबाद १.५०, २ मि. संरक्षण २ गुण), काजल मोरे (३ गुण) यांच्या अष्टपैलू खेळीने विजयाची मोहर उमटवली. प्रतिस्पर्धी सरस्वती संघासाठी जान्हवी लोंढे (३ मि. संरक्षण ४ गुण), हर्षला सकपाळ (१.२० संरक्षण २ गुण), रिया सिंग (१.२०, १ संरक्षण) ची झुंज पुरेशी ठरली नाही.

 


वैभव स्पो. क्लब व शिवनेरी सेवा मंडळाची चमक

दुसऱ्या सामन्यात वैभव स्पो. क्लबने ओम समर्थ भा. व्या. मंदिरवर ९-७ (मध्यंतर ९-३) असा दोन गुणांनी विजय मिळवला. वैभवच्या अवंतिका आंबोकर (४, ४.४० मि. संरक्षण ३ गुण), दर्शिता शर्मा (२.१०, २ मि. संरक्षण), मुग्धा देवळेकर (१.३० मि. संरक्षण २ गुण) तर ओम समर्थच्या सृष्टी पाष्टे (४.५० मि. संरक्षण २ गुण), अन्वी पाटील (२ मि. संरक्षण), जिज्ञासा गायकवाड (१ मि. संरक्षण ३ गुण) यांच्या कामगिरीचे कौतुक झाले.

 


तिसऱ्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने आर्य सेनेवर १०-८ (मध्यंतर १०-०) असा दमदार विजय मिळवत एकतर्फी वर्चस्व राखले. शिवनेरीच्या आरुषी गुप्ताने नाबाद ९ मि. संरक्षण करत २ गुण वसूल केले, इलमा (४.३० मि. संरक्षण व १ गुण) व कार्तिकी कणसे (४ मि. संरक्षण व २ गुण), पराभूत आर्य सेनेच्या सायली जाधव (१.५०, नाबाद १.३० मि. संरक्षण), आरुषी पवारअन्वी काकोडे (प्रत्येकी १.३० मि. संरक्षण )यांनी प्रेक्षकांकडून दाद मिळवली.

 

मुलांच्या गटात ओम साईश्वर, वैभव व ओम समर्थचे वर्चस्व

मुलांच्या पहिल्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने अमरहिंद मंडळावर १२-६ (मध्यंतर १२-३) असा भक्कम विजय मिळवला. ओम साईश्वरच्या निषाद ताम्हणेकर (नाबाद ३.५० मि. संरक्षण १ गुण),  साई तांबुलकर (३.४० मि. संरक्षण ५ गुण), सुजल शिओत्रे (२.५० मि. संरक्षण १ गुण), प्रशीत मोरे (२.४० मि. संरक्षण १ गुण) यांनी तर पराभूत अमरहिंदच्या सोहम मोजर (१.३०, १.३० मि. संरक्षण १ गुण), प्रणय चव्हाण (१.३० मि. संरक्षण ३ गुण) यांच्या खेळीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

 


दुसऱ्या सामन्यात वैभव स्पो. क्लबने श्री समर्थ व्या. मंदिरचा १४-१२ (मध्यंतर ९-७) असा २ गुणांनी पराभव केला.वैभवच्या निहात पंडित (१.५०, ३.४० मि. संरक्षण ४ गुण), निमेश चौगुले (२.३० मि. संरक्षण ५ गुण), राहुल नेवरेकर (२.२०, १.५० मि. संरक्षण ३ गुण), यांनी तर पराभूत श्री समर्थच्या अनिश शिरोडकर (३.४० मि. संरक्षण २ गुण), श्री सुर्वे (१.२० मि. संरक्षण ४ गुण), विहंग पाटील (४ गुण) यांनी शानदार खेळ पेश केला.

 

तिसऱ्या सामन्यात ओम समर्थ भा. व्या. मंदिरने विद्यार्थी क्रीडा केंद्र (ब) वर १०-८ (मध्यंतर ७-३) असा मोठा विजय नोंदवला. ओम समर्थच्या साई गुरवन (६, ३.३० मि. संरक्षण २ गुण), रुद्रसिंग चवान (२.५०, ४ मि. संरक्षण), अनिरुध्द तातुस्कर (३ गुण) तर पराभूत विद्यार्थीच्या अमोल वाल्मिकी (३.४० मि. संरक्षण ३ गुण), आयुष यादव (२ मि. संरक्षण २ गुण) यांचे प्रेक्षकांकडून कौतुक झाले.


Post a Comment

0 Comments