Type Here to Get Search Results !

श्री गणेश आखाड्यातील कुस्तीपटूंचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

  
  

श्री गणेश आखाड्यातील कुस्तीपटूंचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

आमदार नरेंद्र मेहता यांची विकासाला गती देण्याची ग्वाही – राष्ट्रीय, विद्यापीठ व जिल्हा स्तरावर चमकलेल्या पैलवानांचा सत्कार

 

ठाणे : मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने आणि मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाच्या आयोजनातून श्री गणेश आखाड्यातील पैलवानांचा भव्य कौतुक सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. त्यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार व मीरा भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मिलिंद लिमये यांच्या हस्ते फेटा बांधून शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

 

यावेळी माजी नगरसेविका वर्षा भानुशाली आणि वालचंद प्लाझा फेडरेशन चे अध्यक्ष दिनेश केनी यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रम सूत्रसंचालन बलराज बागल यांनी प्रभावीपणे केले. प्रस्ताविक भाषणात मिलिंद लिमये यांनी आखाड्यासाठी अत्यावश्यक असलेल्या जिमची मागणी केली व आमदारांचा सातत्यपूर्ण पाठिंबा अधोरेखित केला.

 

आखाड्याच्या विकासाकरिता सदैव सोबत राहण्याचे आश्‍वासन आमदार नरेंद्र मेहता यांनी दिले. तसेच वर्षा भानुशाली यांनीही मनोगत व्यक्त करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.


सत्कार प्राप्त कुस्तीपटू

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

कोमल पटेल, मनीषा शेलार, विशाल जाधव

 

दहावी उत्तीर्ण

सुप्रिया गुप्ता, जय पवार, लकी अडबल्ले, कविता राजभर, पृथ्वीराज बोबडे

 

बारावी उत्तीर्ण

आदर्श शिंदे, कोमल पटेल, डोली गुप्ता

 

शालेय मीरा-भाईंदर जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आलेले

स्वराज खाडे, मयूर शेडगे, प्रतीक बोबडे, दक्ष चौधरी, युवराज माली, स्पंदन पाटील, अर्पिता चव्हाण, तनुजा मांढरे, हरे कृष्ण तिखट, महेश ढगे, कविता राजभर, सुप्रिया गुप्ता, मनस्वी राऊत, स्नेहा मल्ला, लकी अडबल्ले, ओम जाधव

 

या सोहळ्याची सांगता आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक श्री. बलराज बागल सर यांनी केले. वातावरणात उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत होता.




Post a Comment

0 Comments