श्री मावळी मंडळ शरीरसौष्ठव
स्पर्धेत हृषिकेश व हर्ष ठरले किताब विजेते
१०० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग –
अपोलो फिटनेस माणकोली संघ विजेता, प्लॅनेट फिटनेस डोंबिवली उपविजेता
ठाणे : श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने शताब्दी महोत्सवी
वर्षानिमित्त आयोजित केलेल्या ३६व्या जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव “श्री
मावळी मंडळ स्पर्धेत” अनुक्रमे हृषीकेश हरिदास शामगीर (ऍप्स स्टुडिओ जिम ठाणे) आणि हर्ष दिगंबर
धनावडे (श्री मावळी मंडळ) यांनी चमकदार कामगिरी सादर करत किताब पटकावला. १०० पेक्षा
जास्त सहभागी खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांनी केले. विजेत्यांना पारितोषिक वितरण दत्तात्रय यादव (सहाय्यक पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस स्टेशन), सचिन सूर्यकांत मोरे (पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) यांच्या हस्ते
करण्यात आले. याप्रसंगी सुधाकर मोरे, मनीष मुंदडा, रिस्कन फर्नांडिस, रमण गोरे, संतोष सुर्वे, चिंतामणी पाटील, कृष्णा डोंगरे, प्रभाकर सुर्वे, पॅट्रिक फर्नांडिस, केशव मुकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य विजेते
जिल्हास्तरीय “श्री मावळी मंडळ श्री” – हृषीकेश
हरिदास शामगीर (ऍप्स स्टुडिओ जिम, ठाणे)
अंतर्गत “श्री मावळी मंडळ श्री” – हर्ष दिगंबर
धनावडे (श्री मावळी मंडळ, ठाणे)
सांघिक विजेते
विजेता : अपोलो फिटनेस, माणकोली – १५ गुण
उपविजेता : प्लॅनेट फिटनेस, डोंबिवली – १४ गुण
श्री मावळी मंडळ व्यायामपटूंचा गौरव
स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल खालील व्यायामपटूंचा
सत्कार सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन करण्यात आला :
संतोष मारुती चिंचावडे – महाराष्ट्र सिल्वर, नॅशनल ब्रॉन्झ
शुभम मनोहर जामसुनकर – महाराष्ट्र सिल्वर, नॅशनल सिल्वर
प्रकाश शांताराम मोरे – महाराष्ट्र सिल्वर, नॅशनल सिल्वर
परेश वसंत जागडे – ठाणे श्री ब्रॉन्झ
कौस्तुभ चव्हाण – महाराष्ट्र उदय, नॅशनल ब्रॉन्झ
किशोर जाधव – ठाणे उदय सिल्वर, महाराष्ट्र ब्रॉन्झ
स्पर्धेतील विशेष पुरस्कार
सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक विजेता – शुभम कैलास गायकवाड (बाविसकर जिम, भिवंडी)
उपविजेता – प्रफुल राजाराम मरगज (प्लॅनेट फॅशन, कल्याण)
गट विभागातील निकाल
जिल्हास्तरीय निकाल
गट १ –
1. प्रफुल राजाराम मरगज, 2.
अविनाश तुलसीदास राजपूत, 3.
समीर सुरेश ठाकूर, 4. उसदिन निसार सिद्दीकी, 5.
वासुदेव अमरनाथ वैज, 6.
साजिद समशेर अलीमोमी, 7.
सुरज शिवराम खळे
गट २ –
1. सुनील दत्तु दळवी, 2. हर्ष दिगंबर धनावडे, 3.
रोहन पंडित पाटील, 4. अमित रामचंद्र पाटील, 5.
अजित सुभाषचंद्र शर्मा, 6.
ओम सुधीर पालांडे, 7. श्रीजेश कुरडतकर
गट ३ –
1. हाफिजुर रहेमान शेख, 2.
रोशन डी जाधव, 3. फिरोज अस्लम खान, 4. अविष्कार एके, 5. सुमित रमेश भगत, 6. धीरज लोकवाणी, 7. किरण मोहन साळवी
गट ४ –
1. हृषीकेश हरिदास शामगीर, 2.
अजय रमेश पाटील, 3. आशिष व्यवहार, 4. बंटी लबाना, 5. ओंकार दिनेश उतेकर, 6.
संदेश चव्हाण, 7. किरण सुरेश भोईर
अंतर्गत निकाल
गट १ – 1. ओम सुधीर भोसले, 2. जयेश पानसरे, 3. राजेश दमवगडे, 4. सचिन शेलार
गट २ –
1. हर्ष दिगंबर धनावडे, 2.
सैफ सागवेकर, 3. आदित्य सामले, 4. सुयोग मोरे, 5. अभिषेक पानसरे
गट ३ –
1. प्रतीक बेलोसे, 2.
सागर साळुंखे, 3. आकाश शिंदे, 4. हर्षल पाटील
गट ४ –
1. ओंकार दिनेश उतेकर, 2.
जाहिद शेख, 3. आदित्य शिंदे, 4. रितेश चाकीय
क्रीडा, शिस्त आणि मेहनतीचा विजय साजरा करत या ऐतिहासिक स्पर्धेने
उत्साहपूर्ण वातावरणात सांगता केली.

Post a Comment
0 Comments