धी. युनायटेड स्पोर्ट्स क्लब आयोजित कै. जे. पी. कोळी निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा
सह्याद्री, सरस्वती, शिर्शेकर्स
महात्मा गांधी, ज्ञानविकास, शिवभक्त मावळीची विजयी घोडदौड
मुंबई, ३ डिसें : ठाण्यात सुरू झालेल्या कै. जे. पी. कोळी
निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेने आज रंगतदार सुरुवात
करताच प्रेक्षकांना थराराचा झंझावात अनुभवायला लावला. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व
दि ॲमंच्यूअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या मान्यतेने आणि धी. युनायटेड
स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या भव्य आयोजनाखाली श्री दत्त जयंती उत्सव २०२५
निमित्त होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त
अध्यक्ष दत्तात्रय गोपाळ ठाणेकर, विश्वस्त आयोजक हेमंत जयवंत कोळी आणि महाराष्ट्र
खो-खो असोसिएशनचे सहसचिव व स्पर्धा निरीक्षक
बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांच्या हस्ते पार पडले. या समारोहात मंदार
कोळी (सचिव - ॲमंच्यूअर खो-खो असोसिएशन ठाणे), ऋतुराज
ठाणेकर, भूपेंद्र ठाणेकर, महेश करमळकर,
वीरेंद्र भुवड, मयूर पालांडे, विकास कोळी, दिपेश तांडेल, राहुल
ठाणेकर यांसह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची
उपस्थिती लक्षणीय राहिली.
महिला - सह्याद्री संघ, भांडुप वि. मावळी मंडळ, ठाणे
आज झालेल्या महिलांच्या सामन्यात भांडुपच्या सह्याद्री संघाने ठाण्याच्या मावळी मंडळाचा ६-४
(मध्यंतर १-२) असा २ गुणांनी
पराभव केला. मध्यंतराला मावळी मंडळ १ गुणाने आघाडीवर असताना दुसऱ्या डावात
सह्याद्रीच्या खेळाडूंनी अप्रतिम पुनरागमन करत सामना हिसकावला. सह्याद्री संघाच्या
आर्या मटकर (६.३०, नाबाद
३.२० मि. संरक्षण), मुक्ता येराडे (२.५०, २.१० मि.
संरक्षण), गार्गी राणे (३.३० मि. संरक्षण), तन्वी येराडे (३ गुण)
यांनी तर पराभूत मावळी मंडळाच्या अद्रीका चव्हाण (५.३०, १.५० मि.
संरक्षण), कशिश फावरे (२.५० मि. संरक्षण), निधी सावंत (३.३०, ३.२० मि. संरक्षण) यांनी शानदार खेळ करत
प्रेक्षकांना जागेवरच खिळवून ठेवले.
पुरुष - सरस्वती स्पो. क्लब, मुंबई विरुध्द धी युनायटेड स्पो. क्लब, ठाणे
आज झालेल्या पुरुषांच्या सामन्यात मुंबईच्या सरस्वती स्पो. क्लबने यजमान व ठाण्याच्या धी
युनायटेड स्पो. क्लबवर १५-१० (मध्यंतर ६-५) असा ५ गुणांनी विजय मिळवला. करण गरोळे (१.३०, २ मि. संरक्षण व २ गुण), राहुल जावळे
(३, १.२० मि. संरक्षण व २ गुण), सुरज वैश्य (२, २ मि. संरक्षण व १ गुण), रोहीत जावळे (१.१०, १.२० मि.
संरक्षण व १ गुण) यांनी तर पराभूत यजमान युनायटेडच्या शुभम उत्तेकर (२.३०, मि.
संरक्षण व ३ गुण), हर्षित कोळी (१.४०, १.२० मि. संरक्षण व १ गुण),
साहिल जामसुतकर (१.३०, १.४० मि. संरक्षण), आदित्य जाधव (१ मि.
संरक्षण व २ गुण) यांनी जोरदार खेळ करत प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले.
इतर सामन्यांचे निकाल
पुरुष विभाग
१.
शिर्शेकर्स
महात्मा गांधी ने शिवभक्त क्रिडा मंडळचा एक डाव राखून १ गुणांनी पराभव केला.
२.
ज्ञानविकास
फाउंडेशन ने युवक क्रिडा मंडळ, कल्याणवर १२-११ असा २.२० मि. राखून विजय मिळवला.
३.
मावळी
मंडळ ने विद्यार्थी क्रिडा केंद्रचा १५-९ असा ६ गुणांनी पराभव केला.
४.
ज्ञानविकास
फाउंडेशन ने मावळी मंडळ वर १६-१४ असा २ गुणांनी विजय मिळवला.
५.
शिर्शेकर्स
महात्मा गांधी ने सरस्वती स्पो. क्लब, मुंबईचा २०-११ असा ९ गुणांनी पराभव केला.
महिला विभाग
१.
ज्ञानविकास
फाउंडेशन ने राज क्रीडा मंडळ, बदलापूरचा १३-५ असा १
डाव ८ गुणांनी पराभव केला.
२.
शिवभक्त
क्रीडा मंडळ ने अ. भि. गोरेगावकर उपनगरचा ११-८ असा १ डाव ३ गुणांनी पराभव केला.
३.
शाहू
स्पो. क्लब ने श्री समर्थ व्यायाम मंदीरवर ८-५ असा एक डाव राखून ३ गुणांनी विजय मिळवला.
४.
ज्ञानविकास
फाउंडेशन ने सह्याद्री संघवर १३-४ असा एक डाव ९ गुणांनी विजय मिळवला.
५.
शिवभक्त
क्रीडा मंडळ ने शाहू स्पो. क्लबवर ८-६ असा एक डाव राखून २ गुणांनी विजय मिळवला.
तीव्र
स्पर्धा,
आक्रमक झेप, चकवा, कल्पने
पलीकडचा वेग आणि रणनितीचा दुर्मिळ मेळ या सर्वांचा थरार आता चरणसीमेवर जाणार आहे. ४ डिसेंबर पर्यंत हा महासंग्राम ठाण्यातील क्रीडाप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.


.jpeg)
Post a Comment
0 Comments