उद्यानगणेश शालेय कॅरम स्पर्धेत धमाकेदार प्रारंभ
सोहम, प्रसन्न, उमैरची विजयी सलामी
उद्घाटनालाच रंगतदार सामने
मुंबई : कॅरमच्या पटावर अचूक फटके, आक्रमक डावपेच आणि जल्लोषात उसळलेला उत्साह अशा वातावरणात
श्री उद्यानगणेश मंदिर चषक
विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेला शानदार सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यांमध्ये
सोहम जाधव,
प्रसन्न गोळे,
उमैर पठाण आणि केवल
कुळकर्णी यांनी दणदणीत विजय नोंदवत स्पर्धेत आपली ताकद दाखवून दिली आणि जेतेपदाच्या
लढतीला सुरेख रंग चढवला.
सोहम जाधवचा अचूक खेळ
शारदाश्रम विद्यामंदिर–दादरच्या सोहम जाधवने
सुरुवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण आणि अचूक खेळ करत
पार्ले टिळक विद्यालयाच्या आर्या
सोनारचे आव्हान २१–५ असे संपुष्टात आणले आणि सहज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सोहमच्या नियंत्रित
फटक्यांमुळे सामना एकतर्फी ठरला.
प्रसन्न गोळेचा मोठा विजय
राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळेने
प्रारंभापासूनच आक्रमक खेळ करत कुमुदिनी विद्या मंदिराच्या आदिराज जळकेवर २५–४ असा सहज
विजय मिळविला. प्रसन्नच्या सलग गुणांनी प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.
उमैर पठाणची नील गेम कामगिरी
श्री नारायण गुरु हायस्कूल–चेंबूरच्या उमैर पठाणने
आपल्या अचूक फटक्यांची आतषबाजी करत प्रियांश यादवला २५–० असा नील गेम देत
स्पर्धेतील सर्वांत लक्षवेधी विजय नोंदवला. उमैरच्या खेळात
आत्मविश्वास आणि सातत्य ठळकपणे दिसून आले.
इतर सामन्यांतील ठळक निकाल
आयईएस पाटकर विद्यालय–डोंबिवलीच्या शिवांश मोरेने
ठाकूर रामनारायण पब्लिक
स्कूल–दहिसरच्या तीर्थ ठाकरला १९–१ असे पराभूत केले,
तर शेठ करमशी कानजी स्कूल–मुलुंडच्या केवल कुळकर्णीने
महिला मंडळ विद्यालयाच्या सिद्धेश
बागुलला २०–३ असे हरवत पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित केला.
मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन
या स्पर्धेचे उद्घाटन समितीचे कार्यवाह मधुकर प्रभू,
व्यवस्थापक संजय आईर,
क्रीडा प्रशिक्षक
निशांत पाटील, क्रीडा संघटक सुनील नागवेकर तसेच शिवछत्रपती पुरस्कारविजेते लीलाधर चव्हाण
यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.
पुरस्कार आणि पुढील रंगत
४८ खेळाडूंच्या या स्पर्धेतून पहिल्या १६ विजेत्यांना
आकर्षक चषक, स्ट्रायकर आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात येणार आहे. सलामीच्या फेरीतील अटीतटीच्या
लढती पाहता, पुढील
फेऱ्यांमध्येही स्पर्धा अधिकच रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment
0 Comments