Type Here to Get Search Results !

श्री गणेश आखाड्यात शक्तीचा महायज्ञ! लहान पैलवानांच्या जोरदार उत्साहाचा जल्लोष जोर मारण्याच्या चुरशीच्या स्पर्धेत तब्बल ६०१ सलग जोरांचा विक्रम


श्री गणेश आखाड्यात शक्तीचा महायज्ञ! लहान पैलवानांच्या जोरदार उत्साहाचा जल्लोष

जोर मारण्याच्या चुरशीच्या स्पर्धेत तब्बल ६०१ सलग जोरांचा विक्रम

आखाड्यात घुमला “हर हर जोर!” चा निनाद

 

ठाणे : आज श्री गणेश आखाडा अक्षरशः ऊर्जेने फुलून गेला! लहान पैलवानांच्या उत्साहाला नवे बळ देण्यासाठी आयोजित जोर मारण्याच्या स्पर्धेत आखाड्यातील सर्व पैलवानांनी उस्फूर्त सहभाग नोंदवत आपली ताकद, चिकाटी आणि जिद्द दाखवून दिली. या स्पर्धेत घाम, श्वास आणि इच्छाशक्ती यांची कसोटी पाहायला मिळाली.

 

चुरशीचा थरार : अखेरपर्यंत हार न मानणारी झुंज

ही स्पर्धा इतकी अटीतटीची ठरली की वेळेअभावी स्पर्धा थांबवावी लागली, तरीही पैलवानांच्या उत्साहात कोणतीही कमतरता दिसून आली नाही. ६०१ सलग जोर मारत पै. मंथन खैरे, पै. कृष्णा माने व पै. कार्तिक माने या तिघांनी अविस्मरणीय कामगिरी नोंदवली आणि अखेर या तिघांमध्ये बक्षिसांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, या तिघांपैकी कोणीही हार मानायला तयार नव्हते, हीच या स्पर्धेची खरी जिंकलेली बाजू ठरली.

 

उपक्रमामागील उद्देश : व्यायामातही वाढो चुरस

कुस्तीबरोबरच पैलवानांच्या व्यायामात वृद्धी व्हावी, ताकद, सहनशक्ती व स्पर्धात्मक वृत्ती अधिक भक्कम व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या स्पर्धेमुळे लहान पैलवानांमध्ये व्यायामाबद्दल नवा उत्साह निर्माण झाला असून, सरावाला अधिक शिस्त आणि रंगत येताना दिसत आहे.

 


भविष्यासाठी संकल्प : महिन्यातून दोन शनिवारी व्यायाम स्पर्धा

या यशस्वी उपक्रमानंतर पैलवानांनी एकमुखाने इच्छा व्यक्त केली की, कुस्तीबरोबर व्यायामातही चुरस वाढावी यासाठी महिन्यातून दोन शनिवारी अशा व्यायाम स्पर्धा नियमितपणे आयोजित व्हाव्यात. आखाड्यातील वातावरण पाहता हा संकल्प निश्चितच नवोदित पैलवानांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

 

अखाड्याचा संदेश : ताकद, शिस्त आणि जिद्द

श्री गणेश आखाडा केवळ कुस्तीचे धडे देत नाही, तर ताकद, शिस्त, चिकाटी आणि जिंकण्याची वृत्ती घडवतो, हे या स्पर्धेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अशा उपक्रमांमुळे उद्याचे दमदार पैलवान घडतील, यात शंका नाही!


Post a Comment

0 Comments